सेनेच्या अवाजवी मागण्यांपुढे न झुकण्याची भाजपची भूमिका

 BJP not interest to complete Shivsena demands for government formation
 BJP not interest to complete Shivsena demands for government formation

मुंबई : सत्तेसाठी शिवसेनेने दबाव वाढत नेण्याचे धोरण कायम ठेवले जात असताना अवाजवी आग्रहांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे भाजपतून सांगण्यात येत आहे. 

गेल्या तीन ते चार दिवसांपासून "सामना'त येणाऱ्या लेखातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उपरे संबोधण्याच्या प्रकारामुळे भाजप नाराज आहे. अकारण वार करण्याची शिवसेनेची भूमिका सहन करण्यापलीकडची असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपद देण्याचा कोणताही शब्द शिवसेनेला भाजपने दिलेला नाही.

शिवसेनेने जिंकलेल्या जागा भाजपपेक्षा कमी असल्याने तसा प्रश्‍नही उपस्थित होत नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "चायवाला' संबोधणे, युतीत असतानाही "चौकीदारा'ला चोर संबोधण्याच्या मार्ग अवलंबणे हे प्रकार थांबवावेत, असेही भाजपकडून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काढलेले उद्‌गारही अपमानास्पद आहेत आणि यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना समजून सांगणे गरजेचे असून, अशी अपेक्षा करणे चुकीची आहे काय, असा प्रश्‍नही केला जात आहे.

शिवसेनेने जाहीर टीका करण्याचा मार्ग सोडला, तरच यापुढे चर्चा होईल, असे भाजपने निश्‍चित केल्याचे समजते. शिवसेनेच्या सहकार्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्‍य नसल्याची जाणीव असल्यानेच सध्या कोणतीही हालचाल केली जाणार नाही, असेही समजते. 

Web Title: BJP not interest to complete Shivsena demands for government formation

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com