ध्यास नवे काहीतरी करण्याचा, आवड दररोज घालता येतील असे दागिने बनवण्याचा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 मार्च 2019

दागिने आणि त्यातील वेगवेगळ्या डिझाइन्सची आवड नाही अशी भारतीय महिला दुर्मीळच. परंतु पिवळेधमक सोन्याचे दागिने प्रत्येकालाच परवडतील असे नाही. आणि ‘पांढरी’ म्हणजेच चांदीच्या दागिन्यांची जागा साधारणतः पायातच (पैंजणापुरतेच मर्यादित). त्यामुळे दररोज घालता येण्याजोगे दागिने बनविणे, ते जास्त खर्चिकही असू नयेत आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांची कलाकुसर नाजूक आणि आकर्षक असावी या सर्व बाबींचा ताळमेळ बसविणे म्हणजेच मोठे आव्हानच. परंतु हे कठोर वाटणारे आव्हान सहज सोपे केले आहे ‘ऑर्नेट ज्वेल्स डॉट कॉम’च्या शेली लुथ्रा यांनी. 

शेली लुथ्रा यांचा जन्म पंजाबचा. मात्र लग्नानंतर पतीच्या नोकरीनिमित्ताने त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. सुरवातीपासूनच दागिने, फॅशन डिझाइनिंगची आवड असल्याने त्यांनी अमेरिकेत गेल्यानंतर या क्षेत्रासंबंधी काही कोर्सेस देखील पूर्ण केले. घर-संसार सांभाळत आवड म्हणून ज्वेलरी शॉपमध्ये कामदेखील केले. पाश्‍चिमात्य देशांमधील महिला दररोज वापरणाऱ्या कपड्यांवर मॅच होतील, अशी दागिने वापरतात हे तेथे काम करताना लक्षात आले. विशेष म्हणजे, चांदीच्या दागिन्यांना विशेष मागणी असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे दागिन्यांकडे गुंतवणूक म्हणून न पाहता स्त्रियांच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी त्याचा वापर व्हावा आणि भारतीय तरुणी-महिलांना देखील हा पर्याय उपलब्ध व्हावा, या हेतूने त्यांनी भारतात माघारी येऊन पुणे येथून ऑर्नेट ज्वेल्स डॉट कॉम या ई कॉमर्स वेबसाइटला सुरवात केली. 

दररोज वापरता यावीत अशी दागिने बनविण्यावर त्यांचा भर आहे. विशेषतः नोकरी करणाऱ्या महिला आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणींमध्ये देखील दागिन्यांबद्दलचा दृष्टिकोन बदलत आहे. त्यामुळे स्वस्त दरातील गुणवत्तापूर्ण दागिने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचविण्याचा त्यांचा मानस आहे. त्या स्वतः या दागिन्यांच्या डिझाइन्स आणि निर्मितीत लक्ष घालतात. विशेष म्हणजे खास चांदीचे दागिने विकणारी ही भारतातील पहिलीच ई कॉमर्स कंपनी असल्याचे त्या आवर्जून सांगतात. अगदी जम्मू काश्‍मीरपासून ते आसाम-नागालॅंडपर्यंत त्यांच्या दागिन्यांना पसंती मिळत असल्याचे त्या सांगतात. या क्षेत्रात खूप संधी असून अधिकाधिक उद्योजकांनी विशेषतः महिलांनी या क्षेत्रात येण्याचे त्यांनी आवाहन केले.

Web Title: Business Women sheli luthra maitrin supplement sakal pune today

संबंधित बातम्या

Saam TV Live