महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आलाय. बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौर संदीप जोशींच्या वाहनावर बेछुट गोळीबार केला. सुदैवाने गोळ्या गाडीवर लागल्याने महापौर या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. सलग चार गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले. या हल्ल्यानंतर शहरात दहशतीचं वातावरण पसरलंय. महापौर संदीप जोशी लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून कुटुंबिय आणि आपल्या मित्रासह नागपूर शहराकडे परतत होते. याआधी 6 डिसेंबरला महापौर संदीप जोशी यांना धमकीचं निनावी पत्रदेखील आलं होतं. यासंदर्भात त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिल्याची देखील माहिती आहे.
महापौर संदीप जोशी कुटुंबीयांसोबत जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथून परत येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने संदीप जोशी आणि कुटुंबीयांना कोणतीही दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जोशी यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
महापौर संदीप जोशी जामठा जवळील रसरंजन धाब्यावर लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. मध्यरात्री ते शहरात परत येत होते. त्याच्यासोबत काही अन्य गाड्याही होत्या. त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळीच्या गाड्या पुढे होत्या. सर्वात शेवटी महापौर संदीप जोशी यांची फॉर्च्युनर गाडी होती. दरम्यान, दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी महापौरांच्या गाडीवर देशी कट्यातून बेछुट गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर चार गोळ्या झाडल्या.
महापौर संदीप जोशी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेसंदर्भात संदीप जोशी यांनी पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना माहिती दिली. तसेच बेलतरोडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यावेळी संदीप जोशी यांचे मित्रमंडळीही घटनास्थही उपस्थित होते.
महापौर संदीप जोशी यांनी शहरातील वाहतुकीची कोंडी सोडिविण्यासाठी शहरातील प्रमुख मार्ग व बाजार भागातील अतिक्रमण काढण्याचा मनोदय व्यक्त केला होता. तसेच नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी शंभर तक्रार बॉक्स लावले होते. यामुळे त्यांना धमकीचे पत्र आले होते. यात त्यांना व कुटुंबीयांनी ठार मारण्याची धमकी दिली होती, हे विशेष.
सोमवारपासून शहरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यामुळे शहरात पोलिसांचा तकडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांची संख्या असताना महापौरांवर हल्ला होणे म्हणजे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संदीप जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद अविवेशनात उमटतात का, असा प्रश्न आता निर्मा झाला आहे.
Web Title: firing on Mayor Sandeep Joshi vehicle
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.