असं असेल आजचं तुमचं भविष्य : काय काळजी घ्यावी वाचा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

 23 ऑक्टोबर, 2019 बुधवार 
मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर काहींना आर्थिक लाभ संभवतात. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. 

वृषभ : आरोग्य उत्तम असणार आहे. प्रसन्नतेने कार्यरत रहाल. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. 

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाचे आर्थिक कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. 

 23 ऑक्टोबर, 2019 बुधवार 
मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर काहींना आर्थिक लाभ संभवतात. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. 

वृषभ : आरोग्य उत्तम असणार आहे. प्रसन्नतेने कार्यरत रहाल. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. 

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाचे आर्थिक कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. 

कर्क : दुपारनंतर काहींना आर्थिक लाभ संभवतात. व्यवसायातील महत्त्वाची आर्थिक कामे दुपारनंतर मार्गी लावू शकाल. काहींना गुप्त वार्ता समजतील. 

सिंह : दिवसाची सुरवात जरी निराशाजनक झाली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह वाढणार आहे. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवासात काळजी घ्यावी. 

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

तूळ : आरोग्य उत्तम राहील. प्रवास होणार आहेत. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. दुपारनंतर काहींना विविध लाभ होतील. 

वृश्‍चिक : सार्वजनिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. मानसन्मानाचे योग येतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. 

धनू : मानसिक अस्वस्थता दुपारनंतर कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील. 

मकर : वाहने चालवताना दक्षता हवी. दुपारनंतर काहींना मानसिक अस्वस्थता राहणार आहे. चिकाटी वाढेल. 

कुंभ : जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. चिकाटीने कामे मार्गी लावाल. 

मीन : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून कामे मार्गी लावावी लागतील. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. 

पंचांग 23 ऑक्‍टोबर 2019 
बुधवार : आश्‍विन कृष्ण 10, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.33, सूर्यास्त 6.07, चंद्रोदय रात्री 1.19, चंद्रास्त दुपारी 2.45, भारतीय सौर कार्तिक 1, शके 1941. 

 

Web Title: Horoscope and Panchang of 23 October 2019


संबंधित बातम्या

Saam TV Live