नवऱ्याची पत्नीला नग्न करून मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 मार्च 2019

लाहोर (पाकिस्तान): नवरा व त्याच्या दोन कर्मचाऱयांसमोर नृत्य करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी मला नग्न करून मारले. मारहाण करत असातनाच माझे केस कापले, माझ्यावर नको-नको ते अत्याचार केले. सामाजिक संस्थांसह शक्य त्यांनी प्लिज, प्लिज मला मदत करा, असे भावनिक आवाहन पाकिस्तानमधील अस्मा अझीझ या महिलेने व्हिडिओद्वारे केले आहे.

अस्मा अझीझचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पाकिस्तानमधील विविध प्रसारमाध्यमांनी संबंधित वृत्त प्रसारीत केले आहे. अम्साने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'मंगळवारी (ता. 26) माझ्या नवऱयाने त्याच्यासह त्याच्या दोन कर्मचाऱयांसमोर नृत्य करण्यास सांगितले. नृत्य करण्यास नकार दिल्यामुळे तो चिडला. त्याच्या दोन कर्मचाऱयांनी माझ्ये हात धरले व नवरय़ाने उघडे करून मला मारहाण केली. मारहाण होत असतानाच केस धरून ओढत होते. तिघांनी मिळू माझे केस ओढून, कापून व जाळून काढले. यावेळी माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. नग्नअवस्थेत मला लटकावले होते. हे सर्व झाल्यानंतर कान्हा पोलिस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असताना पोलिसांनी माझ्याकडे पैशांची मागणी केली. माझे सर्व नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. मला रहायला घर नाही. माझ्याकडे पैसे नाहीत. पोलिसांना मी कोठून पैसे देणार. प्लिज, सामाजिक संस्थांसह शक्य त्यांनी मला मदत करा.'

दरम्यान, अस्माने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले. कान्हा पोलिस चौकीच्या पोलिस निरिक्षकाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मानवधिकार मंत्री शिरेन माझारी यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Husband and employees allegedly strip woman naked beat her over refusal to dance for them at pakistan

संबंधित बातम्या

Saam TV Live