सुप्रसिद्ध 'येवले' चहामध्ये भेसळ, रंग मिसळल्याचं झालं उघड

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 जानेवारी 2020

पुणे : शहरातील प्रसिद्ध आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस पडलेला 'येवले अमृततुल्य चहा' पुन्हा अडचणीत आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने पुन्हा एकदा येवलेवर कारवाई केली आहे. येवले चहामध्ये भेसळ असल्याचे एफडीएने सिद्ध केले आहे. केंद्र सरकारच्या एफडीए विभागाच्या प्रयोगशाळेतील अहवालामध्ये या चहात भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. 

यापूर्वीही येवले चहावर एफडीएची कारवाई झाली होती. त्यावेळी येवलेतील काही नमुने विभागाने जप्त केले होते. पहिल्या अहवालात या चहामध्ये कोणतीही भेसळ निष्पन्न झाली नव्हती. मात्र, दुसऱ्या अहवालात या चहामध्ये सिंथेटीक फूड कलर आढळून आला. यामुळेच या चहाला लाल रंग येतो. केंद्रिय प्रयोगशाळेने हा अहवाल दिल्याने पुन्हा एकदा येवले चहा अडचणीत आला आहे. 

आता पुन्हा एकदा येवलेवर कारवाई झाल्याने उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे. यापूर्वी पुण्यातील कोंढवा भागातील कारखान्यात मेलानाईट हा पदार्थ आढळल्याने येवलेवर कारवाई करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा येवलेवर कारवाई झाल्याने चहाप्रेमींचा निरस झाला आहे. 

Web Title: action on Yewale Chaha by FDA for adulteration in Pune

संबंधित बातम्या

Saam TV Live