VIDEO | भाजप सत्ता स्थापन करण्यास असमर्थ, सेनेकडून जनादेशाचा अनादर-पाटील

VIDEO | भाजप सत्ता स्थापन करण्यास असमर्थ, सेनेकडून जनादेशाचा अनादर-पाटील

मुंबई : भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करणार नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. भाजपच्या नेत्यांनी राज्यपालाची भेट घेऊन सरकार स्थापण करणार नसल्याची माहिती त्यांना दिली. राज्यातील जनतेला महायुतीला जनादेश दिला. मात्र शिवसेनेकडून साथ मिळाली नाही. शिवसेनेनं जनादेशाचा अपमान केल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केलीय. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करावं अशा शुभेच्छाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिल्यात

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

आम्हांला सरकार स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाकड़ून निमंत्रण दिलं, पण शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी सोबत येत नाही म्हणून भाजपने राज्यपालांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जनतेचा कौल महायुतीला होता. याचा अपमान करून शिवसेनेला सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांना शुभेच्छा असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्यावर भाजपच्या कोअर समितीकडून चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. भाजपने आज कोअर समितीची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर सरकार स्थापन करण्याचा दावा न करण्याचा निर्णय भाजपने घेतला.

भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेनेला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळणार असल्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेने पहिल्यापासून मुख्यमंत्री आमचाच हे स्पष्ट सांगितलेले आहे. त्यामुळे आता राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर त्यांच्याजोडीला कोण असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, चौदाव्या विधानसभेसाठी राज्यात 21 ऑक्‍टोबरला मतदान होऊन 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी झाली. विधानसभेचे निकाल जाहीर होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला. विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रकाशित झाली आहेत. तरीही, सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाने दावा केला नव्हता. 

या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी घटनेतील तरतुदीनुसार विधानसभेत 105 आमदारांचे संख्याबळ असलेला सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपकडे पहिल्यांदा विचारणा केली होती. सध्या भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे 145 आमदारांचे संख्याबळ नाही. मुख्यमंत्रिपदावरून वाद असल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या चर्चा बंद होती. त्यामुळे बहुमत नसताना सरकार स्थापन करायचे यावर भाजपचे मत ठाम झाले आहे. 

Web Title: maharashtra political updates bjp does not make Government

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com