VEDIO | भाजपचे 'हे' खासदार अजित पवारांना का भेटले?

ncp leader ajit pawar meets bjp leader pratap chikhalikar
ncp leader ajit pawar meets bjp leader pratap chikhalikar

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आज, पुन्हा भाजप नेत्याला भेटले आहेत. त्यामुळं राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. त्याचा राजकीय अर्थ घेऊ नका, असं अजित पवार यांनीच मीडियाशी बोलताना स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आज, विधानसभेत विश्वास दर्शक ठरावाला सामोरं जात असताना ही अजित पवारांची भाजप नेत्यांशी झालेली चर्चा महाविकास आघआडीच्या नेत्यांची धडधड वाढवणारी आहे. 

काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते प्रतापराव चिखलीकर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. आज विधानसभेत विश्वास दर्शक ठरावावेळी अजित पवार सभागृहात काही दगा फटका करतील का? अशी चर्चा सुरू झाली. याचा अंदाज आल्यामुळेच अजित पवार यांनी बैठकीनंतर तातडीने मीडियाशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, 'प्रतापराव चिखलीकर यांची भेट राजकीय नव्हती. राजकारणात आम्ही एकमेकांचे विरोधक असलो तरी आमची ओळख असते संबंध असतात. चिखलीकर आणि माझ्यात झालेल्या बैठकीचा राजकीय अर्थ अजिबात काढू नये. सभागृहात आज विश्वास दर्शक ठराव मांडला जात आहे. मी स्पष्टपणे सांगतो की, मी कोणाच्याही संपर्कात नाही. सभागृहातील लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून लोकांना अजित पवार कोणाच्या बाजूने उभा राहिला हे कळेल. सभागृहात कोर्टाचा आदेशानुसार ठराव, मतदान होईल. संजय राऊत यांनी सांगितलेला 170 चा आकडा गाठला जाईल. उपमुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारसाहेब, सोनिया गांधी,उद्धव ठाकरे जी हे निर्णय घेतील. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी घेईन.'

आज, विश्वास दर्शक ठराव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज, विधानसभेत त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सध्या विधानसभेत 170च्या आसपास आमदार आमच्या पाठिशी आहेत, असा दावा महाविकास आघाडी कडून केला जात आहे. हे 170 आमदारांचं बहुमत सिद्ध करण्याचं शिवधनुष्य आज, उद्धव ठाकरे यांना उचलावं लागणार आहे. 

Web Title: ncp leader ajit pawar meets bjp leader pratap chikhalikar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com