'क्‍या हुआ तेरा वादा' हे गाणे वाजवून महापालिकेच्या दारात राष्ट्रवादीचे आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 मार्च 2019

पुणे : स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत पुणे शहराचे स्थान घसरल्याने महापालिकेतील विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपविरोधात आंदोलनाची मालिकाच सुरू केली आहे. 'पुणे शहर देशातील सर्वोत्तम शहर करू' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्‍वासनाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 'क्‍या हुआ तेरा वादा' हे गाणे वाजवून महापालिकेच्या दारात आंदोलन केले. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराची घसरण झाली असूून या स्पर्धेत पुणे 37 व्या क्रमांकावर गेले आहे. या स्पर्धेसाठी महापालिकेने वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रचंड तयारी करीत, कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र स्पर्धेत महापालिकेला आपले स्थान टिकविता न आल्याने विरोधक आक्रमक झाले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आणि मनसे आंदोलन केले. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा आंदोलन करून सत्ताधारी भाजपची कोंडी केली.

पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. पक्षाच्या नगरसेवकांसह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वच्छ सर्वेक्षणाच्या खर्च आणि नेमकी कामे याचाही हिशेबही आंदोलनकर्त्यांनी मागितला.

Web Title: NCP targets CM Devendra Fadnavis over swachh survekshan 2019 results

संबंधित बातम्या

Saam TV Live