आता 36 जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु होणार...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 जानेवारी 2020

मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारचे बहुप्रतीक्षित खातेवाटप आज झाल्यानंतर आता या सरकारसमोर पालकमंत्र्यांच्या निवडीचे आव्हान आहे. मुख्यमंत्री वगळून मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ४२ इतकी आहे तर, राज्यात जिल्ह्यांची संख्या ३६ आहे. त्यामुळे सहा जणांची पालकमंत्री पदावर वर्णी लागणार नाही, हे निश्‍चित आहे. 

मंत्रिमंडळातील सरसकट ३० कॅबिनेट मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची संधी दिली तर राज्य मंत्र्यांमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू होणार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे पालकमंत्रिपदासाठी ३६ जिल्ह्यांची विभागणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या वाट्याला आणखी कमी संख्या येणार आहे. सध्या शिवसेना १३, राष्ट्रवादी काँग्रेस १२ आणि काँग्रेस ११ या संख्येने पालकमंत्री नेमणार असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या पालकमंत्री पदाकडे लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन आणि खातेवाटपावरुन आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कुरबुरी सुरु आहेत. त्यातच आता पालकमंत्रिपदासाठी कशी चुरशीची लढत होते, तसंच कोण कोण आणि कशी आपली खदखद व्यक्त करतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Web Title: Now the challenge is the choice of guardian minister

संबंधित बातम्या

Saam TV Live