पाकिस्तानात उभारणार डॉ. बाबासाहेब अंबेडकर भवन

पाकिस्तानात उभारणार डॉ. बाबासाहेब अंबेडकर भवन

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची दखल जगभरात घेतली जात आहे.डॉ.आंबेडकरांची सामाजिक चळवळ शेजारील पाकिस्तानात ही फोफावली असून त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आंबेडकर भवनची निर्मिती करण्याचा निर्णय पाकिस्तान दलित सॉलिडेटरी नेटवर्क संस्थेने घेतला आहे.

पाकिस्तानातील दलित संघटना भारतात
पाकिस्तानमधील मिठी थेरपारकर शहरात पाकिस्तान दलित सॉलिडेटरी नेटवर्क आणि दलित सुजाग टेहरिक या दोन संघटना कार्यरत असून, आंबेडकरवादी सामाजिक चळवळीचा प्रसार करण्याचं काम करीत आहेत.संघटनात्मक कार्य आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबेडकरवादी विचार लोकांपर्यंत पोचवण्याचं काम सुरू आहे.संघटनेचे कार्य वाढल्याने आता स्वतःच आंबेडकर भवन निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संघटनेने भारतात येऊन दिल्लीतील काही आंबेडकरवादी संघटनांच्या कामाचा अभ्यास ही केला.

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका
पाकिस्तान सरकार मध्ये समाजिक विकास खात्यात अधिकारी असणाऱ्या मालजी मेघवाल यांनी या कार्याला वाहून घेतले आहे.आंबेडकर भवन उभारण्यासाठी सिंध प्रांतातील मिठी शहरात भूखंड ही घेतला आहे.या ठिकाणी आंबेडकर भवनची निर्मिती करून त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य असणारे अद्यावत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. आंबेडकरी साहित्याचं भाषांतर करण्याचा देखील संस्थेचा मानस आहे. त्याबरोबर विद्यार्थ्यांसाठी होस्टेल सुरू करून त्यांच्या अभ्यासिकेची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मालजी मेघवाल यांनी दिली.  

पाकिस्तानातील एकूण हिंदू लोकसंख्येपैकी 80 लोकसंख्या ही अनुसूचित जाती वर्गातील आहे. पाकिस्तानात ही मागासवर्गीयांना जातीयतेचे चटके बसत असून आपल्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले असल्याचे मेघवाल यांनी सांगितले, असे असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उद्धारासाठी उभारलेल्या लढ्यापासून हा समाज अनभिज्ञ आहे. 2006 रोजी पाकिस्तानात झालेल्या जागतिक सामाजिक मंचाच्या माध्यमातून आम्हाला आंबेडकरांच्या कार्याची ओळख झाल्यानंतर आम्ही आंबेडकर वादाकडे आकर्षित झाल्याचे मेघवाल यांनी सांगितले.

गुप्तहेर असल्याचा संशय 
पाकिस्तान दलित सॉलिडेटरी नेटवर्क आणि दलित सुजाग टेहरिक या दोन संघटनांच्या माध्यमातून 2006 पासून आम्ही पाकिस्तानात आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. दोन संघटनांच्या माध्यमातून 50 कार्यकर्ते आम्ही तयार केले असून, आंबेडकरी विचारधारा दलित वर्गातील लोकांपर्यंत पोचवण्याचं काम सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय असल्याने आमच्यावर देखील भारतीय गुप्तहेर असल्याचा संशय व्यक्त करत त्रास दिला जातो. मात्र, त्याची परवा न करता आंबेडकर भवन उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे ही मालजी मेघवाल यांनी सांगितले.

Web Title: pakistan based dalit union to build memorial of dr. b. r. ambedkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com