गणपती विसर्जनासाठी गेलेला आणि जीव गमावला...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे काल (ता. 12) रात्रीच्या दरम्यान गणपती विसर्जनासाठी गेलेला आर्यन विनोद इंगळे (वय अंदाजे 11) हा पाण्यात बुडाला असून ज्ञानगंगा नदीपात्रात त्याचा शोध सुरू आहे. गावकऱ्यांनी त्याचरात्री नदी्पात्राजवळ एकदोन ठिकाणी लाइट लावून कितीतरी वेळपर्यंत शोध घेऊन पहिला परंतु त्याचा शोध लागला नव्हता.शेवटी अंधारामुळे ही शोध मोहीम थांबविण्यात आली.

त्यावेळी घटनास्थळावर तहसिलदार तसेच जिल्हा परिषद सदस्य मधुकर वडोदे, पंचायत समितीचे उपसभापती प्रभाकर वानखडे व पोलिस हजर होते.दुसरे दिवशी पुन्हा ही शोध मोहीम सुरू होणार असली सध्या येथे पाऊस सुरू असल्याने शोध मोहिमेस अडचणी निर्माण होत आहे.

भूमिहीन असलेले विनोद इंगळे यांना दोन मुले व एक मुलगी असून आर्यन हा सर्वात मोठा मुलगा होता. सध्या ज्ञानगंगा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने ज्ञानगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Web Title: 1 dies in ganpati immersion rally at Nandura

संबंधित बातम्या

Saam TV Live