तुमचे आवडते कलाकार देतायत धोका? वाचा, कोट्यवधींच्या फॉलोअर्समागे लपलेली अनेक गुपितं.

साम टीव्ही
शुक्रवार, 24 जुलै 2020
  • बॉलिवूड अभिनेत्री दीपिका, प्रियांकाची पोलिस चौकशी होणार?
  • फेक फॅन्स फॉलोअर्स प्रकरणात 10 बड्या सेलिब्रिटींचा सहभाग?
  • तुमचे आवडते कलाकार देतायत धोका ?

बॉलिवूड अभिनेत्री, अभिनेत्यांचे लाखो, कोट्यवधींचे सोशल मीडियावर फॉलोअर्स असतात. पण, फॉलो करणाऱ्या फॅन्सची अकाऊंट खरी असतात का? हाच प्रश्न उपस्थित होतोय. तुमचे आवडते कलाकारच तुम्हाला धोका देतायत.

अभिनेत्री यांचे कोट्यवधींचे फॅन्स फॉलोअर्स. पण, कोट्यवधींच्या फॉलोअर्समागे लपलीयत अनेक गुपितं.

दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा या दोघींना सोशल मीडियावर सर्वाधित लोक फॉलो करतात. पण, हे फॉलोअर्स फॅन फेक असल्याचा दावा केला जातोय.

ट्विटर आणि इन्स्टाग्राम मिळून दीपिकाचे 78 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर प्रियांका चोप्राचे 81 मिलियन फॉलोअर्स आहेत.

पण, सोशल मीडिया स्कॅमप्रकरणी दीपिका आणि प्रियंकाची मुंबई पोलिस चौकशी करणार असल्याची शक्यता आहे. यासोबतच जवळपास 175 हाय प्रोफाईल लोकांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी होऊ शकते.

 काय आहे प्रकरण?

  • कोट्यवधी फॅन्स असल्याचे दाखवून सेलिब्रिटी मोठमोठ्या कंपन्यांकडून जाहिरात मिळवून कोट्यवधी रुपये कमावतात
  • फॅन फॉलोअर्सची संख्या वाढविण्यासाठी फेक प्रोफाईल बनवणाऱ्या टोळक्याला लाखो रुपये देतात 
  • फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर प्लॅटफॉर्मवरून खोटे प्रोफाईल बनवून लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जायची
  • काही खोट्या पोस्ट सुद्धा करण्यात आल्या होत्या
  • खोट्या पोस्टमुळे समाजात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण होत होतं
    या संपूर्ण सोशल मीडिया स्कॅम प्रकरणात 54 वेगवेगळ्या कंपन्यांवर पोलिस नजर ठेवून आहेत. या प्रकरणात एकाला कुर्ला येथून अटकही करण्यात आलीय. चौकशीत सेलिब्रिटींचे फेक आयडी बनवून फॉलोअर्स वाढविण्यात आल्याचे समोर आलेय. शिवाय त्याच सेलिब्रिटींच्या खऱ्या सोशल मीडिया अकाउंटमध्येही कोट्यवधी फेक फॉलोअर्स असल्याची माहिती मिळालीय. त्यामुळे फेक फॉलोअर्स प्रकरणात बडे सेलिब्रिटीही गोत्यात येऊ शकतात.


संबंधित बातम्या

Saam TV Live