तान्हाजी सिनेमा बघून जेवायला आलात तर इथे तुम्हाला मिळेल 10% सूट

ओंकार राजेंद्र कदम
मंगळवार, 14 जानेवारी 2020

सातारा : नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आलेला तान्हाजी...द अनसंग वॉरियर हा सिनेमा सध्या चांगलाच लोकप्रिय ठरला आहे...बॉक्सऑफिसवर या सिनेमाने आपली कमाल दाखवून दिली आहे..आणि आतापर्यंत रेकॉर्डब्रेक कमाईही केली आहे..
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू शूरवीर सहकारी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. यात अभिनेता अजग देवगण याने तानाजी यांची भूमिका साकारली असून अजयच्या करियरमधला हा शंभरावा सिनेमा आहे.
अजय देवगणसह या सिनेमात काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत...तसंच मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे...
कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली ही कथा आपण ऐकत आलो आहोत.. हीच कथा अतिशय सुरेख पद्धतीने तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे.
दरम्यान चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद पहाता वर्षांच्या सुरुवातीलाच हा सिनेमा हिट ठरण्याच्या मार्गावर आहे..

काही ठिकाणी या सिनेमाच्या कथानकावरुन आक्षेप घेतला जात असताना दुसरीकडे मात्र हा ऐतिहासिक सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पहावा यासाठी विविध ऑफर्स दिल्या जात आहेत..त्याचा प्रसारही सुरू आहे.,...
अशातच साताऱ्यातील एका शिवप्रेमी हॉटेल व्यावसायिकांनी सध्या सर्वत्र गाजत असणाऱ्या तान्हाजी हा सिनेमा बघून येणाऱ्या प्रत्येकाला होणाऱ्या बिलावर 10% सूट दिली आहे.
साताऱ्यातील लखन पवार,लखन गोसावी आणि सौरभ सप्रे या तीन शिवप्रेमी मित्रांनी मिळून येवतेश्वर कास रस्त्यावर असणाऱ्या निसर्गरम्य परिसरात "रानवारा" हे हॉटेल सुरू केले आहे.
मटण थाळी स्पेशल असणाऱ्या या हॉटेलमध्ये त्यांनी सध्या सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ घालत असणाऱ्या तान्हाजी हा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील सिनेमा बघून आल्यावर तिकीट दाखवून 10% डिस्काउंट दिला आहे.
त्यांच्या या संकल्पनेचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर ही संकल्पना आणि हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवर असणारे अनोखे प्रेम कौतुकाचा विषय बनले आहे.

Webtitle: 10% Discount in hotel after watching Tanhaji movie


संबंधित बातम्या

Saam TV Live