VIDEO | बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 10 हजारांची कत्तल ठाकरे थांबवणार?

माधव सावरगावे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रं हाती घेताच आरेतल्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिली. त्यांच्या या निर्णयाचं पर्यावरणप्रेमींनी स्वागत केलंय. पण आता मुख्यमंत्री हीच भूमिका औरंगाबादमधल्या बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बाबतीत घेणार का? असा सवाल विचारला जातोय. कारण तिथंही वृक्षांचा श्वास धोक्यात आहे. 

औरंगाबादच्या सिडको भागात प्रियदर्शनी उद्यानातील 17 एकर जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं भव्य स्मारक उभारलं जाणारंय. महापालिकेनं 45 कोटींचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलं असून जिल्हा नियोजन समितीनं 5 कोटींचा निधीही महापालिकेला दिलाय. या जागेत बाळासाहेबांचा 93 फुटांचा पुतळा आणि म्युझिअम असेल. बाळासाहेबांचे मराठवाड्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यामुळे त्यांची क्षणचित्रे चित्रफितीच्या रूपात दाखविण्याची सोयही या ठिकाणी करण्यात येणार आहे. पण खरा प्रश्न आहे तो इथल्या वृक्षतोडीचा...या स्मारकासाठी तब्बल 10 हजार झाडांची कत्तल केली जाणारंय. आरेतल्या मेट्रो कारशेडला स्थगिती देत मुख्यमंत्री ठाकरेंनी पर्यावरणप्रेमींची मनं जिंकली..त्यामुळे आता औरंगाबादमधल्या स्मारकालाही ठाकरे हाच नियम लावणार का ? यावरून कुजबुज सुरू झालीय.

या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी आतापासूनच विरोध सुरू केलाय. ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून आंदोलन सुरु झालंय. त्यामुळे आता स्मारकाला हिरवा कंदिल दाखवायचा की 10 हजार झाडांचा श्वास वाचवायचा इथंच मुख्यमंत्र्यांची कसोटी लागणारंय. 

Web Title -  10 thausand trees will cut for balasaheb statue

संबंधित बातम्या

Saam TV Live