प्रश्न आवडला नाही, म्हणून तिने उत्तरच लिहिलं नाही!

प्रश्न आवडला नाही, म्हणून तिने उत्तरच लिहिलं नाही!

मला एखादी गोष्ट आवडत नाही, म्हणून मी करणार नाही असं आपल्यापैकी बरेचजण म्हणतात... त्यापैकी काही तसं करतातही.. 
मात्र एका 10 वर्षांच्या मुलीनं आपल्याला प्रश्न आवडला नाही असं म्हणत, चक्क परिक्षेतील प्रश्नाचं उत्तर लिहायला नकार दिलाय...
यावेळी तिने आपल्याला कमी मार्क मिळतील याचाही विचार न करता, मला प्रश्न आवडला नाही मी उत्तर देणार नाही, असं उत्तरपत्रिकेत लिहिलं...
तिचा हा बिनधास्त स्वभाव पाहून जगभरातील नेटीजन्स तिच्यावर फिदा झालेत...


अमेरिकेतील उटाह राज्यात राहणाऱ्या ऱ्हिदम पकाकोनं हे धाडस केलंय.. ऱ्हिदम 10 वर्षांची असुन मुरे भागातल्या ग्रँट एलिमेंटरी स्कूलमध्ये शिकते..
नुकतीच तिची परीक्षा संपली.. तिला गणिताच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला होता.. ‘शेजारच्या तक्त्यामध्ये तीन मुलींचं वजन दिलंय. 
त्यातली सर्वात जास्त वजनाची मुलगी सर्वात कमी वजनाच्या मुलीपेक्षा किती जड आहे?’ असा तो प्रश्न होता.. या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याएवजी ऱ्हिदमनं माफ करा,  मला हा प्रश्न  आवडला नाही, 
हा प्रश्न अपमानजनक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लिहिणार नाही असं थेट उत्तरपत्रिकेत लिहिलं....त्यामुळे या मुलीच्या धाडसाचं कौतुक केलं जातंय. 


ऱ्हिदमच्या या उत्तराचं स्क्रिनशॉट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतंय. ऱ्हिदम फक्त एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने नंतर तिच्या शिक्षकांना पत्र लिहून देखील आपला राग व्यक्त केला. 
‘मला रूक्ष वागायचं नाही. पण मला वाटत नाही की ते गणित चांगलं होतं. तो प्रश्न लोकांना जज करत होता’, असं तिने या पत्रात लिहिलंय.
आता तिचं हे उत्तर समोर आल्यानंतर नेटिझन्स वेगवेगळ्या कॉमेंट्स करुन तिचं कौतुक करतायत..

Web Title : 10 Year Old Girl Refses To Answe The Question

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com