100 वर्षाच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क

100 वर्षाच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क

खामगाव (बुलडाणा) : तालुक्यामध्ये मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. त्यातच पाहुरजीरा ता शेगाव येथील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 100 वर्षाच्या आजी मंजुळाबाई सपकाळ मतदान केंद्रावर दाखल झाल्या होत्या. मंजुळाबाई ह्या माजी सैनिक कै. अर्जुन सपकाळ यांच्या पत्नी असून त्या 100 वर्षाच्या आहेत.

मंजुळाबाईंनी मतदानाची इच्छा दाखविली तेंव्हा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे हे त्यांना  घेऊन आले व त्यांची मतदानाची इच्छा पूर्ण झाली. ह्यावेळी श्रीधर सपकाळ, शे अन्वर, मसुम शाह श्रीकृष्ण परस्कार, शिवम बोळे, शे शब्बीर व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी गावकऱ्यांनी मंजुळाबाई चे कौतुक केले.

Web Title: marathi news 100 years old lady voted at buldana

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com