घरकाम करणाऱ्या महिलांना रोखणाऱ्यांना सोसायट्यांचे कान टोचा

घरकाम करणाऱ्या महिलांना रोखणाऱ्यांना सोसायट्यांचे कान टोचा

तुमच्या घरातल्या कामाची, लॉकडाऊनमुळे घरकाम करणाऱ्या महिला घरी येऊ शकत नव्हत्या. मात्र आता अनलॉकमध्ये त्यांना घरोघरी काम करण्याची मुभा दिलीय. तरीही त्यांना घराबाहेच रोखलं जातंय. घरकाम करणाऱ्या महिलांना कोण रोखतंय आणि सरकारच्या आदेशाला केराची टोपली कोण दाखवतंय.

भांडी घासणाऱ्या हातांच्या व्हिजने सुरूवात करावी हे राबणारे हात कधीकाळी आपल्या घरात राबत असायचे. आपलं घर स्वच्छ करत असायचे. आपण भरपेट जेवून ढेकर देत लोळत पडलेलो असताना, हे हात राबात राहायचे. इतकंच नव्हे तर, आपल्या संसाराला एका अर्थाने हातभारच लावायचे हे हात. पण... पण... याच हातात आता पडलेत साखळदंड. कोरोनाच्या संकटात या हातांवर बंधनं आली होतीच, मात्र आता अनलॉकमध्येही सोसायट्यांनी या हातांना जखडून ठेवलं. अनेक सोसायट्या घरकाम करणाऱ्या महिलांना सोसायटीत प्रवेश करण्यास मज्जाव करतायत. त्यामुळे त्यांच्याही पोटांवर उपासमारीची संक्रांत कोसळलीय. गृहनिर्माण सोसायट्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर प्रसिद्ध डॉक्टर जलील पारकर यांनीही संताप व्यक्त केलाय.

मुळात, अनलॉक सुरू केल्यानंतर घरकाम करणाऱ्या महिलांना सोसायटीत प्रवेश नाकारू नये आणि सुरक्षेचे नियम पाळत घरकाम करणाऱ्या महिलांना सोसायटीत प्रवेश देण्याचे आदेशच सरकारने काढलेयत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घर कामगार व वाहनचालक यांना सोसायटीत  प्रवेशबंदी केलेली नाही. मात्र काही सहकारी गृह निर्माण संस्था शासनाच्या आदेशाविरुद्ध नियम बनवत आहेत. तरी गृहनिर्माण संस्थांनी स्वत:चे नियम बनवत घरकामगार महिलांना सोसायटीत प्रवेश नाकारू नये

खुद्द सरकारनेच आदेश देऊनही अनेक सोसायट्या मनमानी पद्धतीने या महिलांना सोसायटीच्या गेटवरच अडवतायत. कोरोनाच्या संकटात स्वत:ची सुरक्षा बघायला हवीच, पण त्याचसोबत इतरांनाही आधार द्यायला हवा. मात्र, अशा काळात काही गृहनिर्माण सोसायट्यांनी घेतलेली भूमिका मानवतेला हरताळ फासणारी तर आहेच, पण घरकाम करणाऱ्या अनेक महिलांच्या कुटुंबावर उपासमारीची टांगती तलवार आणणारीही आहे. कोरोनाच्या संकटात स्वत:सह इतरांच्या जीवासह पोटाचीही काळजी घ्यायला हवी. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांच्या पोटावर लाथ मारणाऱ्या आणि सरकारचे आदेश धाब्यावर बसवत स्वत:ची तुघलकी नियमावली तयार करणाऱ्या सोसायट्यांचे कान सरकारने टोचायलाच हवेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com