दहावीचा राहिलेला भुगोलाचा पेपर रद्द करणार?

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

 कोरोनामुळे दहावीचा यंदाचा पेपर बोर्डाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला. परंतु सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता ही परीक्षा रद्द करणे योग्य ठरणार आहे. असे मत पालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करतायत.

कोरोना लॉकडाऊनचा फटका दहावीच्या परीक्षार्थींनासुद्धा यंदा बसला. कोरोनामुळे दहावीचा यंदाचा पेपर बोर्डाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला. परंतु सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता ही परीक्षा रद्द करणे योग्य ठरणार आहे. असे मत पालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करतायत.

राज्यातील जवळपास १७ लाख ६५ हजारांहुन अधिक विद्यार्थांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलीय. हा पेपर आताच्या परिस्थितीत घेणे अवघड असल्याचे वास्तव आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत सरकारने दहावीच्या भूगोल विषयाची परीक्षा रद्द करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. या परीक्षेबाबत १४ एप्रिलनंतर निर्णय घेणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. परंतु आता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

Web Title - marathi news is 10th geography paper will be cancel?


संबंधित बातम्या

Saam TV Live