कोरोना तर कोरोना त्यात आता सारी रोगामुळे 11 जण दगावले...

कोरोना तर कोरोना त्यात आता सारी रोगामुळे 11 जण दगावले...

औरंगाबादमधून एक चिंता वाढवणारी बामती आहे. औरंगाबादमध्ये सारी आजाराने हात पाय पसरायला सुरुवात केलेय. या आजाराने 10 दिवसांत अकरा जणांचा बळी घेतलाय. सारी आणि कोरोना या दोन्ही आजाराची लक्षणं सारखीच आहेत. सारीच्या रुग्णाला एकदम सर्दी, ताप येतो. तापाचं प्रमाण जास्त असतं. शिवाय अशक्तपणा येतो. निमोनिया, श्‍वसनाचा त्रास, छातीत दुखणं, रक्तशुद्धीकरण क्षमता कमी होणे, यासारखी लक्षणे आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्हेंटिलेटर ठेवल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे धोका वाढलाय.

सारी आणि कोरोना या दोन्ही आजाराची लक्षणे सारखीच आहेत. सारीच्या रुग्णाला एकदम सर्दी, ताप येतो. तापाचे प्रमाण जास्त असते. शिवाय अशक्तपणा येतो. निमोनिया, श्‍वसन त्रास, छातीत दुखणे, रक्तशुद्धीकरण क्षमता कमी होणे, यासारखी लक्षणे आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्हेंटिलेटर ठेवल्याशिवाय पर्याय नसतो.  दोन ते तीन दिवसात मृत्यू होण्याचा धोका असतो. औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये सध्या सारीच्या प्रत्येक रुग्णाची तपासणी केली जातेय. सध्यास्थितीत साडेचार ते वीस रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

Web Title - marathi news 11 die due to SAARI disease ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com