तमिळनाडूमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

तमिळनाडूच्या तिकोरीनमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय. यामध्ये पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षात 11 जण ठार, तर 40 हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे. वेदांता या ब्रिटिश कंपनीच्या 'स्टरलाइट कॉपर' प्रकल्पाद्वारे भूजल प्रदूषण होत असल्याची तक्रार असून, या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध आहे. या कंपनीविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन सुरू असून, आंदोलनाचा आजचा शंभरावा दिवस असल्याने जवळपास पाच हजार आंदोलक जमले होते.

तमिळनाडूच्या तिकोरीनमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय. यामध्ये पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षात 11 जण ठार, तर 40 हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे. वेदांता या ब्रिटिश कंपनीच्या 'स्टरलाइट कॉपर' प्रकल्पाद्वारे भूजल प्रदूषण होत असल्याची तक्रार असून, या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध आहे. या कंपनीविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन सुरू असून, आंदोलनाचा आजचा शंभरावा दिवस असल्याने जवळपास पाच हजार आंदोलक जमले होते. यावेळी संघर्ष पेटला आणि पोलिस एक तरी ठार झाला पाहिजे अस म्हणत लोकांवर गोळीबार करतानाचा व्हिडीओ समोर आलाय. दरम्यान, हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याच्या आंदोलकांच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. या प्रकल्पावर मोर्चा नेण्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्याने जमाव हिंसक बनला. राजकारणात पदार्पण केलेले कमल हसन यांनी जखमी आंदोलकांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. मात्र जखमींच्या नातेवाईकांनी कमल हसन यांना विरोध करत निघून जाण्यासा सांगितलं.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live