सावधान! कोरोनाची ही 11 नवी जिवघेणी लक्षणं

साम टीव्ही
गुरुवार, 16 जुलै 2020
  •  
  • कोरोनाची 11 नवी जिवघेणी लक्षणं
  • संक्रमण आणखी वाढण्याची भीती
  • ही लक्षणं दिसली तर काळजी घ्या 

भारतासह जगभरात कोरोना संक्रमण वेगानं वाढतंय. या चिंतेत भर टाकणारी एक बाब समोर आलीय. कोरोनाची 11 नवी लक्षणं आढळून आलीयेत. काय आहेत ही नवी लक्षणं, पाहुयात-

भारतासह जगभरात कोरोनाचं संक्रमण वेगानं वाढतंय. जसजसा काळ पुढे सरकतोय तसतशी कोरोनाची लक्षणंही बदलताना दिसतायेत. 
सुरूवातीच्या काळात कोरोनाची चार लक्षणंच सांगण्यात येत होती. मात्र आता 11 लक्षणं दिसू लागली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या 11 लक्षणांची यादीच प्रसिद्ध केलीय.

कोरोना व्हायरसची नवी लक्षणं

सुरूवातीच्या काळात ताप आणि खोकला, घशात खवखव, सर्दी आणि श्वास घेण्यास त्रास होणं ही चार कोरोनाची प्रमुख लक्षणं होती. मात्र आता या चार लक्षणांसोबत अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी भरून येणे, अतिसार, उल्टी, कफमधून रक्त जाणे या नवीन लक्षणांची भर पडलीय. 

फायनल व्हीओ - एकीकडे कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे कोरोनाच्या लक्षणांमध्ये सातत्यानं बदल होतायेत. परिणामी संशोधकांचीही चिंता वाढलीय. तुमच्यात जर या 11 लक्षणांपैकी काही लक्षणं आढळली तर आजार अंगावर काढू नका...तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राला भेट देऊन तपासणी करा. तुमची आमची सतर्कताच कोरोनावर मात करू शकेल.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live