आईच्या अखेरच्या प्रवासाला बेरोजगारीचा खोडा, वाचा जीव गेल्यानंतरही पैशांअभावी कशी अवहेलना होते...

साम टीव्ही
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020
  • अखेरच्या प्रवासाला बेरोजगारीचा खोडा
  • 3 दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्येच पडून
  • अंत्यविधीला पैसेच नसल्याने मुलंही हतबल 

शवगरात ठेवलेल्या आईच्या मृतदेहाकडे डोकावून पाहत असलेली मुलं...मृत्यूनंतर 3 दिवस झाले. पण, आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास पैसे नसल्याने ही मुलं हतबल झालीयेत. आईच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने ही मुलं स्वत:लाच दोष देतायत. लॉकडाऊनमुळे यांची नोकरी गेली. दोघेही बेरोजगार झाले. एकामागोमाग एक धक्के सहन करत असतानाच आईचा अपघात झाला. आईच्या उपचारासाठी जमवलेले पैसेही खर्च झाले. त्यात आईही साथ सोडून गेली. या मुलांवर ही दुर्दैवी वेळ कोरोनामुळे आलीय. 

अखेरच्या प्रवासाला बेरोजगारीचा खोडा

मयत भारती बस्तवाडकर यांची ही दोन मुलं सुरज आणि युवराज हॉटेलमध्ये काम करत होती. हॉटेलमध्ये काम करून आईचा सांभाळ करायची. पण, लॉकडाऊनमुळे त्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि दोघेही बेरोजगार झाले. आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील शवागरात मृतदेह तसाच पडून राहिला. ही माहिती हेल्प फॉर निडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना समजताच त्यांनी मुलांशी संपर्क साधला. आणि अनगोळकर यांनी शववाहिकेतून मृतदेह स्मशानात नेला. 

अखेर 3 दिवसांनी एका संस्थेची मदत मिळाली. आणि त्यानंतर भारती यांच्या मुलांनी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले. मुलांकडे पैसेच नसल्याने मृत्यूनंतरही या आईची अवहेलना झाली. हे कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळं झालंय. अजून किती दिवस हा कोरोना लोकांचे असे हाल करणाराय. हे येता काळच जाणो.


संबंधित बातम्या

Saam TV Live