दिवाळीचा फराळ आणि मिठाई खाताना सावधान! कारण...

साम टीव्ही
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

दिवाळीतला फराळ अशा पद्धतीने त्रासदायक ठरू शकतो, मात्र फराळ नसेल तर दिवाळी कसली? त्यामुळे दिवाळीचा फराळ करताना काही घरगुती उपाय केले तरी, त्रासांपासून सुटका होऊ शकते.

आता बातमी दिवाळीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाची. दिवाळी म्हटलं की उत्साहाचं उधाण आणि फराळाची रेलचेल. पण यंदाच्या दिवाळीला कोरोनाच्या संकटाची किनार आहे. त्यामुळे फराळ तुमचं आरोग्य बिघडवू शकतो... म्हणून फराळ खाताना काय काळजी घ्यायला हवी. पाहूयात.

दिवाळी म्हटलं की उत्साहाला उधाण आणि फराळाची रेलचेल. पण, इतर सणांप्रमाणेच यंदाच्या दिवाळीलाही कोरोनाची काळी किनार आहे. त्यामुळे, दिवाळीचा फराळ खात असाल तर अधिकची काळजी घेण्याची गरज आहे. कारण, आरोग्याला अपायकारक असणाऱ्या आणि कोरोनाला पोषक ठरू शकतील अशा गोष्टी टाळणं अत्यंत गरजेचं आहे.

  • अनारसे, शंकरपाळी, ओल्या नारळाच्या करंज्या, रव्याचे पदार्थ, गव्हाच्या पिठाचे पदार्थांमुळे वाताचा त्रास होण्याची शक्यता
  • मिश्र डाळींचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, मुगाचे लाडू, पोह्यांचा चिवडा, चकलीमुळे पित्त वाढण्याची भीती असते.
  • शेव, कडबोळी, तिखट शंकरपाळ्यांमुळे कफाचा त्रास वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
     
  • दिवाळीतला फराळ अशा पद्धतीने त्रासदायक ठरू शकतो, मात्र फराळ नसेल तर दिवाळी कसली? त्यामुळे दिवाळीचा फराळ करताना काही घरगुती उपाय केले तरी, त्रासांपासून सुटका होऊ शकते.

फराळ खाताना काळजी घ्या

दिवाळीचा फराळ करताना वरचेवर कोमट पाणी प्यायला हवं. त्याचसोबत पित्तप्रकृती, वातप्रकृती असणाऱ्या आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच फराळ करायला हवा. दिवाळीचा फराळ करणाऱ्यांनी व्यायामावरही भर देण्याची गरज असून, दुकानातील मिठाई, चॉकलेटचा अतिरेक टाळायला हवा. 

सणासुदीत खाण्याची चंगळ असते, पण मंडळी, यंदाची दिवाळी मात्र कोरोनाच्या संकटात साजरी होणारेय. कारण, कोरोनाचा राक्षस आ वासून बसलाय. त्यामुळे, दिवाळीत फराळ खाताना अधिकची काळजी घेण्याची गरज आहे. कारण, दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, म्हणून आरोग्याचा दिवा घरोघरी तेवत ठेवायला हवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live