औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे पडघम, नामांतराच्या मुद्द्याला दिली जातेय हवा

साम टीव्ही
सोमवार, 21 डिसेंबर 2020
  • औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे पडघम
  • निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा नामांतराचा मुद्दा
  • नामांतराच्या मुद्द्याला दिली जातेय हवा

निवडणुका जवळ आल्या की औरंगाबादमध्ये नामांतराचा मुद्दा पुन्हा जोर पकडू लागतो..हीच बाब या वेळीही समोर आलीय. औरंगाबाद निवडणुकांचे पडघम वाजू लागताच सुपर संभाजीनगरच्या मुद्द्याला हवा दिली जातेय.

निवडणूक जवळ आली की औरंगाबादमध्ये नामांतराचा विषय सुरू होतो. औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आता पुन्हा एकदा 'औरंगाबाद की संभाजीनगर' या नामांतराच्या राजकारणाला सुरुवात झालीय.

औरंगाबाद शहरात पर्यटन वाढीस लागावं आणि नव्या पिढीला शहराचा इतिहास समजावा यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाने ‘लव्ह औरंगाबाद’च्या माध्यमातून ऐतिहासिक शहराचं ब्रँडिंग सुरू झालंय. तर या प्रशासनाच्या या अभिनव योजनेला मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने ‘सुपर संभाजीनगर’ चे फलक लावून प्रत्युत्तर देण्यात आलंय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शहरात पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांचं भूमिपूजन झालंय. महापालिका निवडणुका तोंडावर असल्याचे हे संकेत मानले जातायत. त्यातच शहरात 'सुपर संभाजीनगर' चे फलक झळकू लागल्याने आगामी महापालिका निवडणुकीत नामांतराच्या चर्चेला अधिक धार चढणार हे नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live