कर्नाटकात विधानसभा अध्यक्षांचा भाजपला दणका, Congress - JDS च्या 14 बंडखोर आमदारांना ठरविले अपात्र

कर्नाटकात विधानसभा अध्यक्षांचा भाजपला दणका,  Congress - JDS च्या 14 बंडखोर आमदारांना ठरविले अपात्र

बंगळूर : राजीनामा दिलेल्या 14 बंडखोर आमदारांना आज (रविवार) कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार यांनी अपात्र ठरविले आहे. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सोमवारी बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजप सरकारला याचा धोका नसल्याचे बोलले जात आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदावरून रमेशकुमार यांना हटविण्यासाठी भाजप विधानसभेत प्रस्ताव आणण्याच्या विचारात आहे. त्यापूर्वीच काँग्रेसच्या रमेशकुमार यांनी गुरुवारी तीन आमदारांना अपात्र ठरविले होते. आता उर्वरित 14 बंडखोर आमदारांनाही अपात्र ठरविले आहे. 

आता अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांना मंत्री होता येणार नाही आणि सध्याच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत लढताही येणार नाही. या आमदारांचे राजीनामे मंजूर करणार की त्यांनाही अपात्र ठरविणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले बी. एस. येडियुरप्पा सोमवारी (ता. 29) विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जातील. यापूर्वी रमेशकुमार यांनी रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी आणि आर. शंकर या तीन आमदारांना अपात्र ठरविले आहे. या निर्णयाला आव्हान देत तिघांनीही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. 

Web Title: 14 Karnataka Rebels Disqualified Day Before Trust Vote

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com