जामिनासाठी सलमान खानला उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

काळवीट शिकारप्रकरणी जेलमध्ये असलेल्या सलमान खानला जामिनासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर जोधपूर कोर्टात असलेल्या सलमानने जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर आज सेशन्स कोर्टात युक्तिवाद पूर्ण झाला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश रविंद्रकुमार जोशी यांनी उद्यापर्यंत अर्जावर निर्णय राखून ठेवला असून उद्या म्हणजे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कोर्ट निर्णय देणार आहेत. दरम्यान कोर्टात जामिनावर अर्जासाठी सुनावणीदरम्यान सलमानच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलविरासह बॉडीगार्ड शेराही कोर्टात उपस्थित होता.

काळवीट शिकारप्रकरणी जेलमध्ये असलेल्या सलमान खानला जामिनासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर जोधपूर कोर्टात असलेल्या सलमानने जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर आज सेशन्स कोर्टात युक्तिवाद पूर्ण झाला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश रविंद्रकुमार जोशी यांनी उद्यापर्यंत अर्जावर निर्णय राखून ठेवला असून उद्या म्हणजे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कोर्ट निर्णय देणार आहेत. दरम्यान कोर्टात जामिनावर अर्जासाठी सुनावणीदरम्यान सलमानच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलविरासह बॉडीगार्ड शेराही कोर्टात उपस्थित होता. तसंच सलमानच्या जामिनाला विरोध करणाऱ्या बिष्णोई समाजाच्या लोकांनीही कोर्ट परिसराबाहेर गर्दी केली होती.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live