राज्याला टीबीचा विळखा! टीबीमुळे रोज 17 लोक गमावतात जीव...

माधव सावरगावे
बुधवार, 18 डिसेंबर 2019

टीबी या आजाराबाबत मोठमोठे दावे प्रशासनाकडून नेहमीच केले जातात. मात्र एका सर्वेक्षणातून टीबीबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. या आजारामुळे एका वर्षात राज्यात जवळपास साडेसहा हजार लोकांनी जीव गमावलाय.

टीबी या आजाराबाबत मोठमोठे दावे प्रशासनाकडून नेहमीच केले जातात. मात्र एका सर्वेक्षणातून टीबीबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. या आजारामुळे एका वर्षात राज्यात जवळपास साडेसहा हजार लोकांनी जीव गमावलाय.

टीबी या आजाराबद्दल लोकांच्या मनात कायम भीती राहिलीय. टीबीच्या नियंत्रणावर प्रशासनाकडून सातत्यानं दावे केले जातात. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. 2018 या वर्षात एकट्या महाराष्ट्रातून तब्बल 6476 लोकांनी आपला जीव गमावलाय. म्हणजे प्रत्येक दिवसाला 17 जणांचा टीबीमुळे मृत्यू होतोय. एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय.

2016 - 6121
2017 - 5066
2018 - 6476 

TB मुळे प्राण गमावणाऱ्या नागरिकांमध्ये उत्तर प्रदेशाचा पहिला तर महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागलाय.  
 

वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यानं आणि औषधांची उपलब्धता होवू न शकल्यानं टीबीच्या रूग्णांचा मृत्यू होत असल्याचं बोललं जातंय. 
TB मुळे जीव गमावणं अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनानं यासाठी वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे. अन्यथा महाराष्ट्राभोवती टीबीचा विळखा आणखी घट्ट होईल. 
Web Title - 17 people die every day due to TB


संबंधित बातम्या

Saam TV Live