CORONA DEATH | धुळ्यात कोरोनाचे एकाच दिवशी 2 बळी, तरुणीचाही कोरोनामुळे मृत्यू

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 11 एप्रिल 2020

जिल्ह्यात कोरोनाचे एकाच दिवसात दोन बळी गेल्याने खळबळ उडालीय. कोरोना सदृष्य रुग्ण म्हणून दाखल असलेल्या 53 वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे मृत्यू झाला.

धुळे : जिल्ह्यात कोरोनाचे एकाच दिवसात दोन बळी गेल्याने खळबळ उडालीय. कोरोना सदृष्य रुग्ण म्हणून दाखल असलेल्या 53 वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे मृत्यू झाला. मृत्यूनंतर आलेल्या अहवालात ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं.

 

तर ९ एप्रिलपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या, तरुणीचाही कोरोनामुळे मृत्यू झालाय. ही तरुणी मालेगावहून धुळ्यात आली होती. तिचाही कोरोना अहवाल प़ॉझिटिव्ह आला होता. या घटनेमुळे धुळ्यातील आरोग्य यंत्रणा हादरलीय. साक्री शहराला सील करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून सुरु झालीय.  नागरिकांनी भीती न बाळगता घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय.

Web Title - marathi news 2 victims in a single day in Corona


संबंधित बातम्या

Saam TV Live