2019 मध्ये स्वाईन फ्लूमुळे 13 जणांचा मृत्यू 

2019 मध्ये स्वाईन फ्लूमुळे 13 जणांचा मृत्यू 

सोलापूर : राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाल्याने स्वाईन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात स्वाईन फ्लूमुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात सद्यःस्थितीत 75 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यामध्ये सर्वाधिक 35 रुग्ण नागपूर जिल्ह्यात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात चार, अमरावती व कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात प्रत्येकी दोन, सिंधुदुर्ग व नगर जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे सोलापूर शहरातील यलप्पा शिवप्पा सन्नाके (मल्लिकार्जुननगर, हत्तुरेवस्ती) यांचाही स्वाईन फ्लूमुळे 18 जानेवारीला मृत्यू झाल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली. राज्यात पुन्हा स्वाईन फ्लू या आजाराचे थैमान माजले असून त्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाकडून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसेच खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. गरोदर महिला, डायबेटिस रुग्ण असे गट तयार करण्यात आले असून औषधांचा साठाही पुरेसा उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापालिकांच्या रुग्णालयांसह जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

राज्यातील रुग्णांची स्थिती 

  • नागपूर  35 
  • पुणे 13 
  • नाशिक 10 
  • अकोला 4 
  • नगर 
  • अमरावती 
  • कोल्हापूर 
  • ठाणे 
  • सिंधुदुर्ग 
  • सोलापूर 
  • सांगली 

राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात स्वाईन फ्लू हा आजार पसरतो. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये, महापालिका दवाखान्यांमध्ये उपचाराची सोय करण्यात आली आहे. स्वाईन फ्लूसदृश आजाराच्या रुग्णांची रक्‍त तपासणी राज्यातील 36 प्रयोगशाळांमधून केली जात आहे. 
- डॉ. प्रकाश भोई, उपसंचालक, आरोग्य विभाग

Web Title: 13 people dead for swine flu in Solapur

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com