सैराट सारखी कृती प्रत्यक्षात; नुकताच बहरात आलेला संसार झाला उध्वस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

तेलंगाणातून राज्यात एक धक्कादायक बातमी समोर आलीय. तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात एका 23 वर्षीय तरुणाची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आलीय. या घटनेला सैराटचीच पुनरावृत्ती असं म्हंटलं जातंय.

प्रणय कुमार नावाच्या तरुण आपल्या गर्भवती पत्नीबरोबर रुग्णालया बाहेर पडला. याच वेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरानं त्याच्यावर कुऱ्हाडीनं वार करून त्याची हत्या केलीय. वार इतका जबरदस्त होता की जागीत प्रणयचा मृत्यू झाला.

आपल्या पतीचा खून करण्या मागे आपले वडिल आणि काकांचाच हात असल्याचं प्रणयच्या पत्नीनं पोलिकांना केलेल्या तक्रारीत म्हंटलंय. प्रणय दुसऱ्या जातीचा असल्यानं आणि लग्नाला घरच्यांचा विरोध असल्यानं आपल्याच घरच्यांनी हे कृत्यं केल्याचं तिनं म्हंटलंय.

तिच्या तक्रारीवरून तिचे वडिल मारूती राव आणि काका श्रवण यांना पोलिसांनी अटक केलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live