प्रेम केलं 'ज्युलिएट'वर.. ती निघाली 'रोमिओ'

तुषार रूपनवर
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

वांद्रे येथील एकाच कॉलेजमध्ये जाणारा तो आणि ती पाहताक्षणीच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि वर्षभरानंतर दोघेही कुटुंबीयांच्या संमतीने विवाहबंधनात अडकले. मात्र लग्नानंतर हनीमूनसाठीची कुलुमनाली भेट, या दोघांच्या नात्याला तिलांजली देणारी ठरली. कारण त्या तरुणाने ज्या तरुणीशी विवाह केला, ती प्रत्यक्षात 'तो' निघाला अन् वराच्या पायाखालची जमीनच सरकली.

हनीमुनसाठी कुलूमनालीला गेल्यानंतर मुलीने विविध कारणे सांगत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. सगळी कारणे अपयशी ठरल्यानंतर तिने आपण 'व्हर्जिनोप्लास्टी' केल्याचे सांगत याबाबत कुणाला सांगितल्यास आत्महत्या करू, अशी धमकीही तरुणाला दिली होती. त्यामुळे तणावाखाळी असलेल्या तरुणाने हा प्रकार घरच्यांना सांगितला. आणि तिचं...'तो' असल्याचं बिंग फुटलं.   तरूणानं पोलिसांत तक्रार दाखल केलीय. पण पोलिसही प्रकरण नाजूक असल्याचं सांगून लगेच कारवाईला तयार नाहीत.

प्रेम केलेल्या तरूणीशी लग्न होणं नशीब ते काय? पण इथं तर प्रेम केलेल्या तरूणीशी लग्न केल्यानं तरूणाला डोक्याला हात लावण्याची पाळी आलीये.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live