राज्यात सीईटीसाठी अडीच लाख अर्ज

राज्यात सीईटीसाठी अडीच लाख अर्ज

पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाला प्रवेश घेण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) आत्तापर्यंत २ लाख ५४ हजार ४५७ ऑनलाइन अर्ज आले आहेत. अर्ज करण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

राज्य सीईटी सेलने सीईटीच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार सात जानेवारीपासून या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पूर्ण ऑनलाइन अर्ज भरलेल्याच विद्यार्थ्यांना ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा देता येणार आहे. मंगळवार पर्यंत २ लाख ५४ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील सुमारे २ लाख २६ हजार ४०६ अर्ज पूर्ण भरलेले आहेत, तर २८ हजार ०५१ हजार अर्ज अर्धवट भरले असल्याची माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली. 

सीईटी सेलने तंत्रशिक्षण विभागांतर्गत पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज स्वीकृती केंद्रे व प्रवेश निश्‍चिती केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या संस्थांनी गेल्या तीन वर्षांत ‘एनबीए’ मूल्यांकन करून घेतले आहेत, अशा संस्थांनी १५ फेब्रुवारीपर्यंत माहिती सादर करावी, अशी माहिती राज्य सीईटी सेलचे परीक्षा समन्वयक डॉ. सुभाष महाजन यांनी दिली आहे.

Web Title 2.5 Lakh Form For Cet Exam

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com