बाहेरच्या देशातून 26 हजार भारतीय परतणार, क्वारंटाईनची तयारी सुरू

बाहेरच्या देशातून 26 हजार भारतीय परतणार,  क्वारंटाईनची तयारी सुरू

त्याचा भारताला मोठा तोटा होऊ शकतो. कारण ते लोक जर कोरोना पॉझिटीव्ह असले तर कोरोनाचा फैलाव नोठ्या वोगोने होईल. त्यामुळे, हा निर्णय कितपत योग्य आहे हा येणारा काळच सांगेल. 

दरम्यान, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि ओमानसारख्या आखाती देशातून 31 मार्चपर्यंत भारतीय नागरिक मुंबईत दाखल होतील. मुंबई महानगरपालिकेकडून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आहे. आखाती देशातून येणाऱ्यांना चौदा दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवणं अनिवार्य आहे. त्यामुळे आधीच कोरोनाच्या तणावाखाली असणाऱ्या, मुंबईतील व्यवस्थेवर साहजिकच ताण वाढणार आहे. तसंच मुंबईत येणाऱ्या या हजारो लोकांमुळे, कोरोनाचा संसर्ग तर वाढणार नाहीना. अशीही  भीती मुंबईकरांनी व्यक्त केलीय.

यासोबतच आणखी एक महत्वाची माहिती समोर येतेय, फिलिपाईन्स, मलेशिया इथून भारतात येण्यासाठी म्हणून सिंगापूर एअरपोर्ट वर 52 भारतीय विद्यार्थी अडकलेत. काल सकाळपासून हे विद्यार्थी सिंगापूर एअरपोर्टवर अडकल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांबरोबर काही पालक अडकल्याचं समजतंय. या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या विद्यार्थ्यांना मुंबईत सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूर मधील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या संपर्कात आहेत. सिंगपूरमधील विद्यार्थ्यांची दूतावास काळजी घेणार असून मुख्यमंत्र्यांनी स्वत: या विद्यार्थ्यांनी बोलून त्यांना दिला धीर दिलाय. 

यावर आता सरकार आणि प्रशासन कशा पद्धतीने काम करते, आणि काय निर्णय घेते. याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

Web Title - marathi news  26,000 Indians will return from other country

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com