महत्त्वाची सरकारी कामं होणार ठप्प ? आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं अस्त्र उगारलंय. आजपासून पुढचे 3 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आहे. या संपामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय.

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर गेलेत. 17 लाख सरकारी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. यामध्ये मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असेल.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळं महत्त्वाची सरकारी कामंही ठप्प होण्याची शक्यता आहे. आपल्या मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मंत्रालयाच्या गेटवर निदर्शनं केली. दरम्यान, राजपत्रित अधिकाऱ्यांनी मात्र 3 दिवस चालणाऱ्या संपातून माघार घेतलीय. 

Web Title :  marathi news 3 days strike for seventh pay commission maharashtra  

संबंधित बातम्या

Saam TV Live