नासा म्हणतं सावधान... पृथ्वीच्या दिशेनं झेपावतायत 3 लघुग्रह, मोठं संकट येण्याचे संकेत...

साम टीव्ही
सोमवार, 20 जुलै 2020
  • सावधान... पृथ्वीच्या दिशेनं झेपावतायत 3  लघुग्रह
  • पृथ्वीवर कोरोनाचं संकट, अंतराळातही मोठी खळबळ
  • 24 जुलैला ग्रह पृथ्वीजवळ येणार, नासाचा इशारा

आधीच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या पृथ्वीवर अंतराळातून एक नवं संकट येतंय. पृथ्वीच्या दिशेनं 3 लघुग्रह अत्यंत वेगाने झेपावतायत. पृथ्वीच्या दिशेनं कोणते ग्रह झेपावतायत वाचा.

कोरोनाचं संकट पृथ्वीवर कोसळलेलं असताना आता पृथ्वीच्या दिशेनं तीन लघुग्रह झेपावतायत. खुद्द नासानेच तसा इशारा दिलाय. यातला एक ग्रह येत्या 24 जुलैला पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. आणि इतर दोन ग्रह पृथ्वीजवळून रविवारी जाणार आहेत. 

 

नासानं काय दिला इशारा?
पृथ्वीच्या दिशेनं झेपावणाऱ्या ग्रहांना नासाने 2016 डीवाय-30, 2020 एनडी आणि 2020 एमई-3 अशी नावं दिलीयत. 2020 एमडी हा ग्रह प्रतितास 48, 000 किलोमीटर वेगाळे पृथ्वीकडे झेपावतोय. त्याचप्रमाणे 2016 डीवाय-30 हा ग्रह 54, 000 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने झेपावतोय. तर 2020 एमई-3 हा ग्रह 16, 000 किलोमीटर प्रतितास वेगाने पृथ्वीकडे झेपावतोय.

पृथ्वीचा प्रत्येक कोपरा न कोपरा कोरोनाने व्यापून टाकलाय. कोरोनाशी लढण्यात संपूर्ण जग गुंतलेलं असताना अंतराळातूनही या तीन ग्रहांच्या रुपाने पृथ्वीवर संकट कोसळू पाहतंय. नासाने इशारा दिल्यानंतर या ग्रहांचा पृथ्वीवर काय परिणाम होणार आणि त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात, यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ कामाला लागलेयत.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live