भारतात कोरोनावर तयार होतायत 3 लस, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आशादायक माहिती

साम टीव्ही
शनिवार, 15 ऑगस्ट 2020
  • तुम्हाला कधी मिळणार भारताची स्वदेशी लस?
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आशादायक माहिती
  • भारतात कोरोनावर तयार होतायत 3 लस

कोरोनाची लस कधी येणार?, असा प्रश्न जगभरातील प्रत्येकाला पडलाय. प्रत्येकजण डोळ्यांत प्राण आणून लसीची वाट पाहतोय, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या लसीबाबत अत्यंत दिलासादायक माहिती दिलीय. पाहूयात.

कोरोनाची लस कधी येणार? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना आणि प्रत्येकजण डोळ्यात जीव आणून लसीची वाट बघत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचंड दिलासादायक गोष्ट सांगितलीय. कोरोनावर खुद्द भारतातच लस बनवण्यात येत असून, एक नव्हे, दोन नव्हे तर तीन संस्था कोरोनावरील लसीची चाचणी करतायत. चाचण्या यशस्वी झाल्यावर लसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाईल आणि फक्त भारतासाठीच नाही तर जगभरात या लसींची निर्यात करण्याचा निर्धारही पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवलाय.

भारतात तयार होतायत 3 स्वदेशी लस
भारत बायोटेकने तयार केलेल्या लसीची चाचणी देशभरातील 12 सेंटरवर होत असून सीरम इन्स्टिट्यूटची लसही चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात आहे. त्याचसोबत झायडस कॅडिलाने बनवलेल्या लसीचीही चाचणी अंतिम टप्प्यात आहे. या तीनही लसींची चाचणी स्वत:वर करण्यासाठी शेकडो वैद्यकीय स्वयंसेवकांनी पुढाकार घेतलाय.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी लस यशस्वी झाल्याचा दावा केल्यानंतर जगभरात आशादायक वातावरण निर्माण झालंय. त्यातच आता भारतातही तब्बल तीन संस्थांच्या लस यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत. ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पदच म्हणावी लागेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live