नाशिक शिवसेनेचे 30 नगरसेवक बंडाच्या तयारीत?

सरकारनामा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

नाशिक : महापालिका स्थायी समितीच्या नियुक्तींतून भाजपला घेरणाऱ्या शिवसेनेला स्वतःच्याच नगरसेवकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार ठराविक लोकांनाच पदे मिळत असल्याने असंतोषाचा भडका उडाला आहे. तीस नगरसेवकांनी वेगळी बैठक घेऊन खलबते केली. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात बंडाची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपला घेरणारी शिवसेना 'बॅकफूट' वर जाण्याची चिन्हे आहेत.

नाशिक : महापालिका स्थायी समितीच्या नियुक्तींतून भाजपला घेरणाऱ्या शिवसेनेला स्वतःच्याच नगरसेवकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार ठराविक लोकांनाच पदे मिळत असल्याने असंतोषाचा भडका उडाला आहे. तीस नगरसेवकांनी वेगळी बैठक घेऊन खलबते केली. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात बंडाची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपला घेरणारी शिवसेना 'बॅकफूट' वर जाण्याची चिन्हे आहेत.

तीन वर्षांपासून महापालिकेत एकसंध असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेत ठराविक चौकटीत पदांचे वाटप केले जाते, असा आरोप करत 30 हून अधिक नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी सुरू केली आहे. आपली खदखद नेमकी कोणाकडे, व्यक्त करायची याचा निर्णय घेण्यासाठी एका नगरसेवकाच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी बैठक झाली. बैठकीत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व गटनेते विलास शिंदे यांच्यावर रोष व्यक्त करण्यात आला.

MySarkarnama@MySarkarnama

रितेश वाट पहात आहेत विलासरावांच्या चित्रपटासाठी चांगल्या स्क्रीप्टचीhttps://www.sarkarnama.in/movie-vilasrao-life-challenge-say-ritesh-deshmukh-50066 … @INCMumbai @MaharashtraPMC @Riteishd

स्व. विलासरावांवर चित्रपट बनवणे आव्हानात्मक : रितेश देशमुख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्यावर चित्रपट लवकरच बनेल अशी अपेक्षा त्यांचे पूत्र व अभिनेते रितेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे. हा चित्रपट बनवणे अत्यंत अवघड असल्याचे त्यांनी...

sarkarnama.in

Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता

''महापालिकेत बोरस्ते, बडगुजर, शिंदे यांच्या व्यतिरिक्त कोणालाच पदे दिली जात नाहीत. सत्यभामा गाडेकर यांचे नाव स्थायी समितीवर ऐनवेळी आले, त्यातही या त्रिकुटाच्या मर्जीतूनच गाडेकर यांचे नाव आले. त्यापूर्वी शिवसेनेत जे काही निर्णय झाले, त्यात नगरसेवकांना विचारात न घेता परस्पर एकाधिकारशाहीने घेतले गेले. पक्षाचे वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आल्यास त्यांना भेटण्यासाठी स्थानिक नेत्यांचे अडथळे पार पडावे लागतात. महत्त्वाची पदे बोरस्ते, बडगुजर, शिंदे यांच्याकडेच आहेत. महासभेत लक्षवेधी सूचना मांडता येत नाही. साधे निवेदन द्यायचे असले तरी परवानगी घ्यावी लागते. महासभेत मोकळेपणाने भूमिका मांडता येत नाही. बोरस्ते, बडगुजर यांचे एकमेकांमध्ये भांडण दिसत असले तरी आतून दोघेही एकच आहेत. नगरसेवकांची दिशाभूल केली जाते. महापौर, उपमहापौर निवडणुकीत सत्तेची गणिते जुळून आली असताना एक तास आधी काय घडले, याची माहिती अद्यापही नगरसेवकांना का दिली जात नाही,''अशा शिवसेना नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. 

स्थायी समिती सदस्य नियुक्तीच्या मुद्यावरून आता खदखद बाहेर पडत असून, या खदखदीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बैठक झाली. बैठकीला नऊ ते दहा नगरसेवक उपस्थित असले तरी 30 ते 32 नगरसेवकांनी बोरस्ते, बडगुजर व शिंदे यांच्या विरोधात मोट बांधल्याचे समजते.

Web Title 30 corporater of Nashik Shiv Sena ready for rebellion?


संबंधित बातम्या

Saam TV Live