CORONA UPDATES | कोरोनासंदर्भातील तुमच्याशी निगडीत महत्वाच्या 30 बातम्या

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

कोरोनानं आता जग आणि देशासह राज्यातही थैमान घालायला सुरुवात केलीय. पाहा कोरोना संदर्भातल्या टॉप ३० बातम्या.

जगासह देशात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केलीये. देशात आतापर्यंत 199 बळी गेलेत तर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आतापर्यंत 6 हजार 412 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 504 बरे झालेत तर 199 लोकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या 5 हजार 709 लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 1364 वर गेलीय, तामिळनाडू 834, आणि राजधानी दिल्लीतला आकडा 700 पेक्षा अधिक झालाय. तेलंगणा, उत्तर प्रदेशातील रुग्णांची संख्या 400 हून अधिक झालीय.

कोरोनासंदर्भातल्या जगासह देशभरातील बातम्या पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा...

 

तर महाराष्ट्र राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या 1364 वर पोहचलीय. तर मुंबईतील रूग्णांची संख्या 876 वर गेलीय. मुंबईखालोखाल पुण्यात सर्वाधिक 181 रूग्ण आहेत. राज्यात काल दिवसभरात 229 नवीन रूग्णांची भर पडलीय. तर 26 जणांच कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात आली. धारावीचा पूर्ण भाग सॅनिटाईझ केला जाणारंय.  हा भाग ड्रोनच्या माध्यमातून सॅनिटाईज करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय मुंबई महानगरपालिकेनं रॅपिड टेस्टची मागणी केली असून, हे किट आल्यावर सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची टेस्ट केली जाईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live