धक्कादायक! 30 पोलिसांना कोरनाची लागण, तर पोलिसांवर हल्ला करण्याचं प्रमाणही वाढलं...

धक्कादायक! 30 पोलिसांना कोरनाची लागण, तर पोलिसांवर हल्ला करण्याचं प्रमाणही वाढलं...

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास काम करतायत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने सात पोलीस अधिकारी आणि 23 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सध्या या सर्व कोरोनाग्रस्त पोलिसांवर उपचार सुरू आहेत. या लॉकडाऊनच्या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 102 घटनांची नोंद झाली असून. तर हल्ले करणाऱ्यांपैकी 162 आरोपींना अटक करण्यात आलीय.

पाहा सविस्तर-

बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. राज्यातल्या 7 पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा लागण झाल्याची पोलीस महासंचालक कार्यालयाची माहिती आहे. या सर्वांवर उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर जणांना क्वारंटईन करण्यात आलंय. लॉकडाऊन दरम्यान राज्यात कलम 188 च उल्लंघन करणारे तब्बल 49 हजार 756 गुन्हे दाखल. 

पालिका अधिकीा, पोलिसांना मारहाण 
मुंबईच्या मानखुर्दच्या येथील लल्लुभाई वसाहतीतील मुजोर फेरीवाल्यांनी पालिका अधिकारी आणि पोलिसांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे , संपूर्ण भारतात करोनाच्यापार्शवभूमीवर लॉक डाऊन आहे.

गर्दी करू नये असे आवाहन केले जात आहे मात्र काहीजण गांभीर्याने घेता संचारबंदीचे उल्लंघन करताना दिसत आहेत, यावर मानखुर्द येथील लल्लुभाई वसाहतीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिका तसेच पोलिसांचे पथक गेले होते. 

या पथकातील पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तसेच महिला पोलिसांनाच या मुजोर फेरीवाल्यांनी मारहाण केली. याप्रकरणी यशमिन शेख , नवाजुद्दीन सोफियायांना अटक केली असून अकबर शेख हा फरार झाला आहे, या चौघांविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तिघांना अटक करण्यात आली आहे तर एकाचा शोध सुरू आहे. या मारहाणीतशीतल माने व देवयानी कुटे या महिला पोलीस जखमी झाल्या. 

तसेच, या फेरिवाला महिलांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही मारहाण केली.एकीकडे करोनाशी लढाईत पोलीस ही आपले योगदान देत आहेत तरअश्‍या मुजोरफेरीवाल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खची होत आहेत,

पोलिसानांवर हात उचलणाऱ्याया फेरीवाल्यांवर कोणाचा वरदहस्त आहे याचा हिशोध घेणे महत्वाचे आहे. क्वारंटईनचे उल्लंघन करणाऱ्या 555 जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. 

Web Title - marathi news 30 policemen infected due to corona 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com