जमू काश्मीरमध्ये 35 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 जून 2018

काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थितीचा फायदा घेऊन 35 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी गटागटानं काश्मीरच्या विविध भागांमध्ये घुसखोरी करु शकतात, अशी माहिती गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिली आहे.

रमजानच्या काळात केंद्र सरकारनं दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवली आहे. गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी चार गट करुन नियंत्रण रेषा ओलांडण्याच्या तयारीत आहेत.

लष्कर-ए-तोयबाचे 18 दहशतवादी काश्मीरच्या कुपवाडामधील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरी करु शकतात. याशिवाय लष्कर-ए-तोयबाचे 8 दहशतवादी नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करु शकतात.

संबंधित बातम्या

Saam TV Live