36 जिल्ह्यांमधील राजकीयसह महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर..

36 जिल्ह्यांमधील राजकीयसह महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर..

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात काय घडतं आहे? प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत ? यासह 36 जिल्ह्यांमधील काय विशेष घडतंय पाहा..36 जिल्ह्यांच्या रिपोर्टमधून...

अकोला- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेदरम्यान मोदींची विरोधकांवर सडकून टीका, कलम 370 हटवल्याने देशातील जनता आनंदी ... मात्र, या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरलाय, म्हणत मोदींनी हाणला टोला.. 

सातारा- पृथ्वीराज चव्हाणांना यंदा घरातली मतंही पडतील का यावर शंका असल्याची उदयनराजेंची खोचक टीका, राजे यंदाच्या निवडणुकीत 2 लाख मतांनी पडतील या वक्तव्याचा उदयनराजेंकडून समाचार.. 

कणकवली- राणेंच्या स्वाभिमान पक्षासह भाजपात प्रवेशावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'युतीचा धर्म आम्हाला कुणी शिकवू नये;, असं म्हणत राणेंना सणसणीत टोला..

पालघर- काँग्रेसला आणखी एक धक्का, काँग्रेसचे माजी मंत्री शंकर नम यांचे चिरंजीव आणि पालघर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार योगेश नम यांचे जेष्ठ बंधू सुधीर नम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..

नांदेड- किनवट भाजपचे उमेदवार भिमराव केराम यांना निवडून द्या, मी किनवटचं पालकत्व स्वीकारतो अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही, किनवटच्या आदिवासी भागासाठी दिलं आश्वासन..

अहमदनगर- 13 वर्षे मंत्री असूनही काही करता आलं नाही,आता बांगड्या भरा असं म्हणत बबनराव पाचपुतेंवर शरद पवारांची घणाघाती टीका..

कल्याण- सुप्रिया सुळेंची भाजपच्या संकल्पपत्रावरुन टीका, निवडणुका आल्यानंतर भाजपला भारतरत्नाची आठवण आली असल्याचा सुप्रिया सुळेंचा टोला..

बीड- परळीत होणाऱ्या मोदींच्या सभेवरुन धनंजय मुंडेची सत्ताधाऱ्यांवर टीका.."उद्या परळीत येताना हेलिकॉप्टर ऐवजी अंबाजोगाई रस्ताने या..म्हणजे तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास दिसेल" म्हणत ट्विटरवरुन विकासकामांचा घेतला समाचार..

उस्मानाबाद- खासदार ओमराजे निंबाळकर चाकूहल्ल्यातून थोडक्यात बचावले, मनगटावर बांधलेल्या घड्याळामुळं दुखापत टळली, मात्र तरुणाने केलेल्या हल्ल्यामागचं नेमकं कारण कळालं नाही..

औरंगाबाद- राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचं पैसे वाटल्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, हा व्हिडियो खरा आहे मात्र हा व्हिडियो मोडतोड करून काही लोकांनी खोडसाळपणे व्हायरल केल्याचं त्यांचं म्हणणं..

सोलापूर- बार्शीचे अपक्ष उमेदवार राजा राऊत यांचे भाषणात अश्लील शब्द आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा व्हिडीओ समोर, राजेंद्र मिरगणे आणि राजेंद्र राऊत दोघेही मुख्यंमंत्र्यांचे निकटवर्तीय असून बार्शीची जागा सेनेला मिळाल्याने आणि राजा राऊत अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने त्यांची जीभ घसरली... 

कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रयत क्रांती संघटनेत प्रवेश केलेले रवीकांत तुपकर यांची घरवापसी,18 दिवसांपूर्वीच रविकांत तुपकर यांनी सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत केला होता प्रवेश, मात्र पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केल्यानं जोरदार चर्चा..

रत्नागिरी- कोकणातील कुणबी समाज अद्यापही विकासापासून वंचित असल्यानं, काँग्रेस - राष्ट्रवादीचं सरकार कुणबी समाजाचे प्रश्न सोडवतील असा विश्वास ठेवत, कुणबी समाजाचे राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांना पाठिंबा जाहीर..

मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा, आदित्य हा माझ्या लहान भावासारखा, देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज असल्याचंही संजूबाबाचं स्पष्टीकरण, व्हिडीओ रेकॉर्ड करुन आदित्यंना भरभरून मतदान करण्याचं केलं आवाहन ...

सांगली- देशात निवडणूक लागलीय असं वाटत नाही.. कारण कोणी विरोधकच शिल्लक नाही- आदित्य ठाकरेंचं सांगलीच्या विटा इथे प्रचार सभेत वक्तव्य... 

नाशिक-  शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदेच्या यांच्या प्रचारात दिसले चक्क बाळासाहेब ठाकरे, प्रती बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळख असणाऱ्य़ा सुरेश रतनलाल प्रचारासाठी हजेरी, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात ते दिसल्याने आश्चर्य..

भंडारा- विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात, त्यांचं निवडणूक चिन्ह ट्रॅक्टर असल्यानं भोंडेकर यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवून केलाय प्रचार..

पुणे- कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं भाजप उमेदवार सुनील कांबळे यांचं नियोजन, भाजप युवा मोर्चा, महिला मोर्चा, पक्ष संघटना आणि विविध आघाड्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या..

ठाणे- महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी आपला जाहिरनामा आणला समोर, जाहिरनाम्यात वाहतूक कोंडी, गरजूंसाठी दवाखाना, ठाणे दर्शन करण्यासाठी खास बस सेवा, बचत गटातील महिला उद्योजकांसाठी योग्य त्या तरतूदी अशी आश्वासनं..

धुळे- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अतिसंवेदनशील भागात पोलिसांचा रूट मार्च, यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, पोलीस कर्मचारी आणि होमगार्डसचा सहभाग..

मुंबई- राष्ट्रीयकृत बँकांसह निवासी भागातील सार्वजनिक बँका आता यापुढे सकाळी 9 वाजताच इघडतील, त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांपाठोपाठ राज्यातील सार्वजनिक बँकमधील व्यवहार 1 नोव्हेंबरपासून जास्त वेळ राहतील सुरू...

बुलडाणा-  दोन वर्षाच्या बाळाच्या श्वास नलिकेत अडकलेला लोखंडी स्क्रू डॉक्टरांनी काढला शस्त्रक्रिया न करता, स्किल आणि अनुभवाच्या जोरावर कुठलीही शस्त्रक्रिया न करता स्क्रू बाहेर काढल्याने डॉक्टरचं कौतुक..

पुणे-  दीड कोटी किंमतीचं ब्राऊन शुगर जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई, या प्रकरणी एका दाम्पत्याला अटक...

हिंगोली- वर्दळीच्या ठिकाणावरून प्रवाशांच्या खिशातील मोबाईल लंपास करणाऱ्या चोराला अटक, चोराकडून तब्बल तीन लाख रूपयांचे 31 महागडे मोबाईल जप्त..

बुलडाणा- तालुक्यातील साखळी गावात अज्ञात इसमाकडून गोठ्याला आग, यात तीन म्हशी आणि एक गाय भाजली तर गोठयातील शेती उपयोगी सर्व साहित्यही जळून खाक..

वाशिम-  झाकलवाडी इथे सोयाबीनच्या गंजीला भीषण आग, अज्ञाताने ही आग लावल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान..

मुंबई-  तापमानाच्या पाऱ्याने गाठला 36 अंश सेल्सिअसचा टप्पा, वाढत्या तापमानामुळे मुंबईकर हैराण, मुंबईचं हे ऑक्टोबरमधील यंदाचं सर्वाधिक तापमान...

रत्नागिरी- लांबलेल्या पावसामुळे दिवाळी फराळ महागण्याची शक्यता, पावसाचा यंदा तूरडाळ वगळता सर्वच डाळींना फटका तर हरभरा डाळीच्या किमती वाढत असल्याने ऐन दिवाळीत लाडूही महागणार...

मुंबई- राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीला वृत्तपत्र विक्रेता दिनानिमीत्त वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी 'मोफत आरोग्य तपासणी शिबीर'.... यासह वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सेल्फी पॉईंटचीही व्यवस्था तर ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता असलेल्या मान्यवरांचा सत्कार..
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com