तुमच्या गावात काय घडतंय पाहा एका क्लिकवर.. 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून

मोहिनी सोनार
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

मुंबई - आचारसंहिता काळात राज्यातून तब्बल 8 कोटी जप्त, यासह आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 34 गुन्हे दाखल

वरळी - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदित्यंच्या वरळीतून 4 कोटींची रोकड जप्त, निवडणूक भरारी पथकाची ही धडक कारवाई, हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणल्याची शक्यता

नालासोपारा - नालासोपाऱ्यात शिवसेना उमेदवार आणि इन्काऊंटर स्पेशलीस्ट प्रदीश शर्मा यांच्यावर बहुजन विकास आघाडीचा गंभीर आरोप, शर्मांनी मतदारांनी पैसे वाटल्याच्या आरोपावरुन नालासोपाऱ्यात तणाव

मुंबई - आचारसंहिता काळात राज्यातून तब्बल 8 कोटी जप्त, यासह आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल 34 गुन्हे दाखल

वरळी - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदित्यंच्या वरळीतून 4 कोटींची रोकड जप्त, निवडणूक भरारी पथकाची ही धडक कारवाई, हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणल्याची शक्यता

नालासोपारा - नालासोपाऱ्यात शिवसेना उमेदवार आणि इन्काऊंटर स्पेशलीस्ट प्रदीश शर्मा यांच्यावर बहुजन विकास आघाडीचा गंभीर आरोप, शर्मांनी मतदारांनी पैसे वाटल्याच्या आरोपावरुन नालासोपाऱ्यात तणाव

लातूर - लातुरात शिवसेनेच्या उमेदवाराच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांचाच राडा, उमेदवार सचिन देशमूख यांच्या प्रचारावेळी एकच गोंधळ

नाशिक - नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार देवयानी फरांदेंविरोधात, आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, पालक मिटिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलवून प्रचार केल्याचा आरोप

औरंगाबाद - कन्नडचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांना MIMचा जाहीर पाठिंबा, 'हर्षवर्धन जाधवांनाच निवडून द्या' खासदार इम्तियाज जलील यांचं आवाहन

अहमदनगर - किर्तनातून भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या इंदुरीकर महाराजांची राजकारण्यांवर चांगलीच टोलेबाजी, अनेकांना लगावले टोले

बीड - सभेच्या स्टेजवर पंकजा मुंडेंना चक्कर, थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रकृती स्थिर 

बीड - मी कधीही माझ्या बहिणीवर झालेली टीका सहन करू शकत नाही - धनंजय मुंडे

सातारा - साताऱ्याच्या सभेत शरद पवारांच्या टीकेवर उदयनराजेंचं प्रत्युत्तर, पवार साहेब चूक तुम्ही नाही आम्ही केली, जनतेनी केली, त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाला मत दिलं यात आमची चूक आहे का? उदयनराजेंचा टोला

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना कालच्या सभेतून कृतज्ञतेची लाट मिळेल - अमोल कोल्हेंचा दावा 

नवी मुंबई - राज ठाकरेंची परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ, महाराष्ट्रात बाहेरून लोंढेच्या-लोंढे येतायत.... या बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे  संपूर्ण राज्याचं समीकरण बिघडत असल्याची टीका 

नांदेड - प्रचाराच्या शेवटच्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस आणि भाजपवर घणाघात, काँग्रेसवाले भुरटे चोर आहेत तर भाजपवाले दरोडेखोर असल्याचं म्हणत जोरदार टीकास्त्र

बुलडाणा - मलकापुरात अभिनेता गोविंदा यांचा प्रचारात सहभाग, भाजप उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारासाठी गोविंदांचा रोड शो 

सोलापूर - शहर उत्तरचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांच्या पदयात्रेसाठी कार्यकर्त्यांनी चक्क 1000 किलो झेंडूची फुल अंथरली, फुलं आंथरुन काढण्यात आलेल्या पदयात्रेची मोठी चर्चा 

कोल्हापूर - मतदानाचा टक्का वाढण्यासाठी एका हॉटेल व्यवसायिकाची अनेखी शक्कल, मतदान करुन येणाऱ्यांना मिसळमध्ये 10 टक्के सूट जाहीर, सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत सवलत 

मुंबई - राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी, येत्या 48 तासांत पुण्यात मुसळधार तर कोकणात अतिमुसळधार, पावसाचा जोर उद्यापर्यत कायम राहणार

पालघर - पालघर जिल्ह्यात काही भागात काल पाऊस, या पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान, हातातले पीक वाया जाण्याची वेळ आल्याने शेतकरी चिंताग्रस्त

नाशिक - नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नाशिककरांचं मोठं नुकसान 

कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये परतीच्या पावसाची हजेरी, मुसळधार झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी, सोयाबीन आणि ऊसाच्या पीकाचं मोठं नुकसान 

चंद्रपूर - चंद्रपुरच्या गोंडपिंपरी तालुक्याला पावसानं झोडपलं, पावसाचा सर्वाधिक फटका पिकांना, शेकडो हेक्टरमधील भात शेती नष्ट

सिंधुदुर्ग - तळकोकणामध्येही पावसाची जोरदार हजेरी, काही ठिकाणी रिमझिम तर कुठे ध-धो पावसाच्या सरी

जालना - भोकरदन तालुक्यातल्या रेलगावमध्ये वीज कोसळून 15 मेढ्यांचा मृत्यू, तर पावसामुळे पिकांचंही मोठं नुकसान

जळगाव - चाळीसगाव परिसरात काल मुसळधार पाऊस, जवळपास 3 तास पावसाचा जोर, चितूर डोंगरी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी, यामुळे गावांचा संपर्क तुटला

मुंबई - मुंबईत पीएमसी बँकेच्या खातेदारांचा आरबीआयवर मोर्चा, या मोर्चात अनेक खातेदरकांना अश्रू आनावर

मुंबई - शिवडीत ओव्हरहेड वायर तुटली, हार्बरची सेवा ठप्प, तर मुंबईत रेल्वेच्या मध्यसह हार्बर आणि पश्चिम मार्गावरही मेगाब्लॉक

रायगड - पेणच्या एसटी स्थानकात कंत्राटी सुरक्षा रक्षकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाचा गेला जीव, एसटीची वाट पाहणाऱ्यावर चढवली बस, सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल

वाशिम - पूर्ववैमन्यसातून देशी दारुचं दुकान युवकाने पेटवून दुकान मालकावर चाकू हल्ला, हल्ल्याची तक्रार पोलिसात दाखल

हिंगोली - हिंगोलीमध्ये चोरट्यांची चक्क पोलिस स्थानकातच चोरी, देशी-विदेशी दारुचे 25 बॉक्स आणि 74 हजारांच्या या मुद्देमालावर चोरट्यांचा हात साफ

अमरावती - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 51 व्या पुण्यतिथीचा सोहळा, लाखो भक्तांची देशासाठी शहीद वीर जवानांना श्रद्धांजली

 

Web Title - 36 jilhe 36 reporters


संबंधित बातम्या

Saam TV Live