कडव्या हिंदुत्ववाद्यांचं होतं मिशन 36; देशातल्या 36 व्यक्तींच्या हत्येची योजना

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर देशातील 36 प्रसिद्ध व्यक्ती असल्याची माहिती समोर आलीय. पत्रकार गैरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला अमोल काळे याच्या तपासातून कडव्या हिंदुत्ववादांच्या 'मिशन 36'चा पर्दाफाश झालाय. 

देशातील एकूण ३६ लोकांच्या हत्येची योजना होती. ज्यात १६ जण महाराष्ट्र राज्यातील, १० कर्नाटक राज्यातील आणि १० जण विविध क्षेत्रातील होते. अमोलच्या डायरीवमध्ये या ३६ लोकांमध्ये साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी, राजकीय नेते, प्रसार माध्यमांतील काम करणारे आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश होता.

या विचारवंतांच्या हत्यांनंतर काही साहित्यिकांसोबतच सीबीआयचे मुंबईतील २ अधिकारी, महाराष्ट्र पोलीस दलातील ४ अधिकारी आणि प्रसार माध्यमांत काम करणारे दोन जण मोस्ट टार्गेटवर होते.

'मिशन 36'साठी 50 खतरनाक शूटर्स आणि रेकी मास्टर्सची निवड करण्यात आली होती. अर्थात हे सारे जण हिंदुत्ववाद्यांच्या स्लिपर सेलपैकीच होते. या चारही हत्यांचे कट रचणारे जण महाराष्ट्रातेच असल्याची माहिती आहे. हत्या करणारे हात समोर आले असले तरी मेंदू मात्र मोकाट आहेत. आता या मास्टरमाईंड खूनी मेंदूंचा शोध पोलिस घेत आहेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live