पाऊस जाता जाईना! आज आणि उद्या कोकण मुंबईत पावसाचा अंदाज

मोहिनी सोनार
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून पावसानं हैराण करुन सोडलं होतं. मात्र आता पुन्हा पाऊस सतावतोय की काय अशी स्थिती निर्माण झालीय. यावेळी महाराष्ट्रात ऐतिहासिकच पाऊस झाल्याची नोंद झालीय. पवसामुळे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालंय. आता हा पाऊस पुन्हा परतणार आसल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून पावसानं हैराण करुन सोडलं होतं. मात्र आता पुन्हा पाऊस सतावतोय की काय अशी स्थिती निर्माण झालीय. यावेळी महाराष्ट्रात ऐतिहासिकच पाऊस झाल्याची नोंद झालीय. पवसामुळे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालंय. आता हा पाऊस पुन्हा परतणार आसल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

अरबी समुद्रात ‘पवन’ नावाचे चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने पुढे सरकते आहे. याचा परिणाम म्हणून ४ डिसेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ४ आणि ५ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

सध्या गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झालीय. मराठवाडा आणि विदर्भात मात्र वातावरण नॉरमल आहे. आणि काहिशी गरमी हवामानात जाणवते आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. यासह विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आलंय. दरम्यान,  ४ डिसेंबरला महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यावर सोसाट्याचा वारा असल्याचंही कळतंय. समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असं आवाहन हवामान खात्यानं केलंय.

 

Web Title - 4 and 5 december rain possibility in kokan and mumbai 

 

 

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात
राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://bit.ly/384UeFJ

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link -
www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook -
www.facebook.com/SaamTV
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!


संबंधित बातम्या

Saam TV Live