हिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळून 43 जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 जून 2019

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील बंजार ते गाडागुशैनी दरम्यान प्रवास करणारी खासगी बस ५०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश होता. ते महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन परतत असताना हा अपघात झाला.

राज्याचे परिवहन मंत्री गोविंद सिंह ठाकूर यांनी अपघातासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. कुल्लू  पोलीस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार,  (बस क्रमांक एचपी ६६-७०६५) जिल्ह्यातील  बंजार तालुक्यातील धोथ मोरजवळ ५०० फूट खोल दरीत कोसळली आहे.

ट्रॅफिकच्या समस्येमुळे बस नियोजित वेळेपेक्षा उशीराने बंजाराहून निघाली होती. ४२ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या बसमध्ये अधिक प्रवासी बसवल्याची माहिती समोर येत आहे. अपूऱ्या आणि चढ असलेल्या रस्त्यावरुन प्रवास करताना बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे ब्रेक न लागल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.  

Web Title: 43 killed in bus accident in Himachal Pradesh

संबंधित बातम्या

Saam TV Live