भारताचं लॉकडाऊन में महिन्यापर्यंत जाणार, 21 ऐवजी 49 दिवस लॉकडाऊनची गरज?

मोहिनी सोनार
सोमवार, 30 मार्च 2020

भारताच्या संचारबंदीचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. दरम्यान 21 दिवसांवरुन 49 दिवस देश लॉक ठेवणं गरजेचं असल्याचं एका अहवालातून समोर आलंय. 

कोरोनानं भारतासह अख्या देशात थैमान घातलंय. त्यामुळे अनेक देशांवर लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झालीय.त्यातच भारतातही कोरोनाचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्यामुळेच सरकारर गांभीर्याने या गोष्टीची दखल घेतंय. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात मोदी सरकारनं लॉकडाऊन जाहिर केलंय. सध्या 21 एप्रिलपर्यंत देशात संचारबंदी असेल असं सागंण्यात आलं होतं. मात्र आता या संचारबंदीचा कालावधी आणखी वाढवण्याची गरज आहे. तरंच कोरोनाचा संसर्ग टाळता येईल असं कळतंय. 

पाहा सविस्तर - 

 

भारतातल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. कारण, भारताला 21 नाहीतर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज असल्याचा सल्ला केंब्रिंज विद्यापीठातल्या भारतीय संशोधकांनी दिलाय. इथल्या भारतीय संशोधकांना गणिताच्या मॉडेलद्वारे 49 दिवसांची गरज असल्याचं सांगितलंय. सोशल डिस्टंसिंग, कोरोना बाधितांवर इलाज आणि कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी 21 दिवस अपुरे असल्याचं या भारतीय संशोधकांनी सांगितलंय.

त्यामुळे हा संचारबंदीचा काळ एप्रिल आणि में महिन्यापर्यंत चालेल. अशी दाट शक्यता आहे. याचा लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होणार आहे, मात्र हे करणं अत्यंत महत्वाचं आहे. तरंच कोरोनाला रोखणं शक्य होऊ शकेल. या काळात सर्वांनी आपापल्या घरात बसणंच तुमचा जीव वाचवू शकेल एवढँ नक्की!

Web Title - marathi news 49 days lockdawn in india due to corona 


संबंधित बातम्या

Saam TV Live