यवतमाळ जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतींत आजपासून रणधुमाळी; अर्जासोबत जातवैधता प्रणपत्र बंधनकारक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 मार्च 2020

यवतमाळ : जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून (ता. सहा) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असले तरी यावेळी राज्य निवडणूक आयोगाने राखीव जागेसाठी असलेल्या ठिकाणी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने अनेकांचा हिरमोड होण्याची शक्‍यता आहे.

येत्या एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी सहा ते शुक्रवार १३ मार्चदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे अनेकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

ग्रीन फंडसाठी अधिभार लावल्याची अजित पवारांची माहितीhttps://t.co/8bZlN75Nlb @AjitPawarSpeaks @NCPspeaks @nawabmalikncp

— MySarkarnama (@MySarkarnama) March 6, 2020

सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करावे लागणार असल्याने सदस्यांमधूनच सरपंचाची निवडणूक होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोळाही तालुक्‍यांत प्रशासन सज्ज झाले असून, गावगाड्यातील मोठी निवडणुकीचा पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने अनेकांचे स्वप्न भंग झाले आहे. मात्र, आधी सदस्य होऊ, मग सरपंच असा निर्णय अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे उमेदवारीवरून आता गटतट समोर येत आहेत

web title :  marathi news From 5 gram panchayats in yavatmal district to the present day, Randhumalai; Ethnicity Certificate bound with application

संबंधित बातम्या

Saam TV Live