कोरोना लस सर्वांपर्यंत पोहोचण्यास 5 वर्षे? सामान्यांपर्यंत लस पोहचणार कशी?

साम टीव्ही
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020
  • कोरोना लस सर्वांपर्यंत पोहोचण्यास 5 वर्षे?
  • 5 वर्ष जाणवणार कोरोना लसीचा तुटवडा?
  • सामान्यांपर्यंत लस पोहचणार कशी?

कोरोना लस कधी येणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. पण ही लस प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत पोहचायला अनेक वर्ष लागू शकतात, अशी भीती वर्तवलीय जातेय. 

कोरोना लस येणार कधी याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. पण ही लस सर्वसामान्यांपर्यंत पोहचायला तब्बल 4 ते 5 वर्ष लागू शकतात, अशी भीती वर्तवण्यात आलीय. विशेष म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO अदर पुनावाला यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना ही भीती व्यक्त केलीय.

कोरोनावर लस सापडली तर 2021 सालापर्यंत 2 अब्ज डोस पोहचवण्याचं लक्ष्य ठेवलंय. त्याचसोबत या लसीचे 50 टक्के डोस आधी गरीब देशांमध्ये पाठवले जातील. पण त्यासाठी लसीच्या वितरणाची काटेकोर व्यवस्था संबंधित देशांना उभारावी लागेल. अर्थात सर्वात आधी कोरोनाग्रस्तांसाठी ही लस वापरली जाईल. त्यानंतर आरोग्यसेवक, लहान मुलं आणि वृद्धांना प्राधान्य दिलं जाईल.

याशिवाय औषधनिर्मिती करणार्‍या कंपन्यांचे उत्पादन आवश्यकतेनुसार वेगाने होत नाहीये. लस कोणाला द्यायची, याचे प्राधान्यक्रम आधीच ठरल्यामुळे ही लस प्रत्यक्षात आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी वर्षानुवर्षांचा कालावधी लागेल, अशी भीती वर्तवण्यात येतेय. केंद्र सरकारनं सामान्यांपर्यंत ही लस लवकरात लवकर पोहचावी यासाठी युद्ध पातळीवर सक्षम यंत्रणा सज्ज ठेवणं आवश्यक आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live