खोट्या बातम्या पसरवाल ;10 वर्षांचा तुरुंगवास भोगल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 मे 2019

सिंगापूर : अनेकदा आपण कोणतीही माहिती न घेता आलेली बातमी (फेक न्यूज) तशीच पसरवित (फॉरवर्ड) असतो. मात्र, आता अशी बातमी पसरविणे सिंगापूरमध्ये चांगलेच महागात पडणार आहे. यासाठी सिंगापुरात नवा कायदा तयार करण्यात आला असून, अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरविणे गुन्हा ठरणार आहे.

खोट्या बातम्या (फेक न्यूज) पसरवित असताना अनेकदा राजकीय नेत्यांसह सामान्यांची बदनामी केली जाते. अशा खोट्या बातम्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र, असे प्रकार रोखण्यासाठी भारतात कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. मात्र, सिंगापूरमध्ये याबाबत कडक पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पसरत असलेल्या खोट्या बातम्या रोखण्यासाठी नवा कायदा तयार करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार खोट्या बातम्या पसरवणे हा गुन्हा ठरणार आहे. याशिवाय या नव्या कायद्यानुसार सरकारला अशा बातम्या पोर्टलवरून हटवण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. 

10 वर्षांचा होणार तुरुंगवास

सिंगापुरात कोणी ऑनलाइन फेक न्यूज दिल्यास त्याला दोषी ठरवण्यात येणार असून, संबंधिताला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 3.77 कोटी रुपयांचा दंडही होऊ शकतो.

Web Title: Singapore Parliament Passes Anti Fake News Law

संबंधित बातम्या

Saam TV Live